Summary of the Book
ध्येय नेहमी मोठं ठेवा, असं आपल्याला सांगितलं जातं, करण ध्येय मोठं असलं, की मार्गक्रमण करण्याची शक्ती आपल्याला प्राप्त होते. एकदा ध्येय निश्चित झालं, की आयुष्याला एक दिशा मिळते. ध्येयापर्यंत जाण्याचा प्रवास हा आनंददायक आणि विकासात्मक असतो. या प्रवासामुळे जीवनाला पूर्णत्व प्राप्त होतं. ही दिशा कशी निश्चित करायची, याचं मार्गदर्शन या पुस्तकाद्वारे मिळतं.
व्यवहारकौशल्य, दुरदर्शीपणा आणि सृजनशीलतेचा अविष्कार घडविण्यासाठी पुस्तक मदत करतं. आपल्याला जी उंची गाठायची आहे, त्याचं प्रशिक्षण मिळणंही आवश्यक असतं. ती वाटचाल अनुभवण्याआधी पुस्तकातील अनुभवांची वाटचाल उपयुक्त ठरते.