प्रेमा तुझा रंग कोणता
Abhikanchan Prakashan-अभिकांचन प्रकाशन Assorted Stories Jadhav Kanchan Abhijeet Babar Kanchan Abhijeet Jadhav Babar Kanchan Babar Kanchan Jadhav Kanchan Jadhav Babar Kathasangrah Prema Tuza Rang Konta Short Fiction Stories Story कथा संग्रह कथासंग्रह कांचन अभिजीत जाधव बाबर कांचन अभिजीत बाबर कांचन जाधव कांचन जाधव बाबर कांचन बाबर जाधव प्रेमा तुझा रंग कोणता
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 250 R 188 / $ 2.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 20% OFF  R 250 R 199 / $ 2.40
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Book Review
Write a review

Kanchan Jadhav
30/04/2024

अभिप्राय : !! प्रेमा तुझा रंग कोणता? !! अभिजात साहित्य हे समाजमनाचा आरसा असते. हाच धागा पकडून साहित्य क्षेत्रात नवीन मुशाफिरी करू पाहणाऱ्या सौ. कांचन अभिजीत जाधव-बाबर यांनी त्यांचा दुसरा कथासंग्रह 'प्रेमा तुझा रंग कोणता?' वाचकांच्या भेटीस आणला आहे. पुस्तक वाचताना यातील प्रसंग जणू आपल्या अवती भवती घडत आहेत असं वाटत राहतं. समाजमनाचे बारीकसारीक तपशील त्यांनी पुस्तकात मांडले आहेत. यातच या पुस्तकाचे यश आहे. या कथासंग्रहात वेगवेगळ्या विषयावरच्या एकूण सात कथा आहेत. एकशे पन्नास पानांच्या या पुस्तकात या दीर्घकथा विखुरल्या आहेत. त्या कथा आपल्याला प्रेमजगताची अनोखी सफर घडवून आणतात. खरंतर यातील प्रत्येक कथेवर एक स्वतंत्र कादंबरी होईल एवढी ताकद या कथांमध्ये आणि अर्थातच लेखिकेच्या लेखणी आणि विचारांमध्ये आहे. प्रेमकथा लिहिणं हे तसं कठीण काम. आलेले अनुभव, पाहिलेले प्रसंग, अवती भवती घडणारे विषय डोक्यात ठेवून ते अलगदपणे कथेच्या आशयाला धक्का न लागू देता कागदावर उतरवणे म्हणजे कौशल्याचं काम. लेखिकेने सर्व कसब पणाला लावून या कथांचं अक्षरशः सोनं केलं आहे. जणू ती या सर्व कथा स्वतः जगली आहे. यातील सर्वच कथा मंत्रमुग्ध करणाऱ्या आहेत. काही प्रसंग तर एवढे तंतोतंत जुळले आहेत की समोर जणू एखादा सिनेमा घडतो आहे. वेडा प्रेमवीर ही अशीच एक कथा. सिनेमाच्या अंगानं जाणारी. अत्युच्च प्रेम, त्याग, समर्पण, जिगिषा वृत्ती ही या सर्व कथांची बीजे. या वृत्तीतून या सर्व कथा उगवल्या आहेत. ही वाट एकटीची मधील स्वतःचा पोटचा गोळा सवतीला देणारी सुमी म्हणजे त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण. घुसमट या कथेतील सरलाताई म्हणजे निमूटपणे अन्याय सहन करणाऱ्या अनेक, विशेषतः जुन्या पिढीतील, स्त्रीचं प्रातिनिधिक रूप! तशीच भावनांची समाधी मधील मृणाल. स्वतःमधले सुप्त गुण ओळखू न शकलेली मृणाल मनाचा कोंडमारा सहन करत राहते! अशा अनेक दर्जेदार प्रेम कथांचा नजराणा लेखिकेने आपल्यासमोर पेश केला आहे. त्यांच्या वृंदा या गाजलेल्या कथासंग्रहानंतरचा हा सलग दुसरा कथासंग्रह. प्रेमकथा लिहिण्यात लेखिकेचा हातखंडा आहे. तो पानोपानी जाणवत राहतो. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः हा कथासंग्रह प्रकाशित केला आहे. त्याबद्दल लेखिकेचं खूप खूप कौतुक. प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा हा कथासंग्रह. सातारा जिल्हयामधील सासर आणि माहेर असणाऱ्या आणि सध्या डोंबिवली येथे स्थायिक असलेल्या लेखिका सौ. कांचन बाबर - जाधव यांना या पुस्तकाच्या यशासाठी अनेक शुभेच्छा. त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले उत्तमोत्तम साहित्य आम्हास वाचावयास मिळेल अशी आशा. त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. पुस्तकाचे नाव : प्रेमा तुझा रंग कोणता लेखिका : सौ. कांचन बाबर जाधव
Sujata
15/03/2024

Writing skill khupach chan aahe
रियाश
15/03/2024

पुस्तक खूप छान आहे .
Jitu
13/03/2024

Nice stories
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat