Summary of the Book
आजारावर डॉक्टरी उपचार करणे आवश्यक असते; पण औषधांशिवाय आपले आरोग्य टिकविता येते, हेही तितकेच खरे आहे. अशा उपचारांची माहिती श. प. पटवर्धन यांनी 'शून्योपचार अर्थात डॉक्टरी उपचार नकोच!' च्या भाग दोनमध्ये दिली आहे. आपल्या मानसिक शक्तीत वाढ करणारे, मन एकाग्र, बलवान, खंबीर करणारे व मानसिक शांती देणाऱ्या शून्योपचारांचा यात विचार केला आहे.
मानसिक सुदृढतेसाठी गायत्री मंत्र, त्राटक, संकल्प, हास्य, नामस्मरण, स्वयंसूचना, मानसिक ताण घालविण्यासाठी मातीचे उपचार, शिवाम्बू चिकित्सा, सूर्यकिरण चिकित्सा, बस्ती, गहू-गवत चिकित्सा आदी निसर्गोपचार, चुंबकीय, दवबिंदू चिकित्सा, मुद्राशास्त्र, अग्नीहोत्र आदी निसर्गोपचार, कसे करायचे हे सांगितले आहे.
सीतेपलादी चूर्ण, कृमी चूर्ण, रक्तवर्धक चूर्ण, अवरोध चूर्ण आदी औषधांची कृती, खोटे बोलण्याने होणारे शारीरिक रोग, बारा क्षार चिकित्सा, अपचन, आम्लपित्त, अंग दुखणे, उलटी, जंत अगदी छोटे आजार तसेच कफ, ताप, मलेरीया, मधुमेह, मुळव्याध, उच्च रक्तदाब आदी मोठ्या आजारांवरील शून्योपचार यात आहेत. काही पौष्टिक खाद्यपदार्थांच्या कृतीही दिल्या आहेत.