Summary of the Book
सुजाण पालक होण्यासाठी काय करावे, याचे मार्गदर्शन या पुस्तकांतील लाखांमधून करण्यात आले आहे. अरुण रामकृष्ण गोडबोले संपादित या पुस्तकातून मुलांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या समजावून घेण्यासाठी काय करावे, पालकांचा दृष्टीकोन कसा असावा, मुलांना वाढवताना काय काळजी घ्यावी याविषयी समजते.
डॉ. चित्र दाभोलकर यांनी नियोजित पालकत्व ते नवजात अर्भकांचे पालकत्व याविषयी लिहिले आहे, तर संजाली तावडे यांनी मुलांच्या जडणघडणीत कुटुंबसंस्थेचे, संस्काराचे महत्व याविषयी सांगितले आहे. प्रा. संध्या चौगुले यांनी अनुभवांचा दाखला देऊन पालकांनी मुलांना घडवावे कसे,'याचा मागोवा घेताना शाळेचा वाट कसा महत्वाचा असतो, हे सांगितले आहे. विद्याधर ताठे यांनी मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवताना वाचनसंस्काराच्या मोलाकडे लक्ष वेधले आहे.