Summary of the Book
वेद म्हणजे फक्त देवांची स्तुती करणाऱ्या ऋचा नाहीत. वैदिक वाङमय म्हणजे निव्वळ यज्ञयाग वा कर्मकांडांची वर्णने नाहीत, वेदकालीन ऋषींनी गणिताचा मुलभूत विचार केला होता. आजही अचंबा वाटेल, असे खगोलशास्त्राचे ज्ञान त्यांनी मिळवले होते. ग्रह - तारे - नक्षत्रांच्या गतीवरून कालगणनेचे अचूक मोजमाप करणारे पंचांग ते मांडत होते. भारताची हि तेजस्वी ज्ञान परंपरा साधार दाखवणारा आद्य ग्रंथ प्रथमच मराठीतून तुमच्यापर्यंत पोहोचवणारे पुस्तक.