Summary of the Book
मानसशास्त्रीय लेखनाचा हा संग्रह आहे. डॉ. विजया फडणीस यांच्या दीर्घ अनुभवातून हे लेख आकाराला आले आहेत. समुपदेशकाच्या भूमिकेतून लिहिलेले हे लेख वेगळ्या आणि महत्वाच्या जगाचे दर्शन घडवितात; तसेच अनेक गैरसमज दूर करतात. समुपदेशक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनाही या पुस्तकातून मार्गदर्शन मिळते. '
प्रश्नोपनिषद' या प्रकरणात मानसशास्त्रसंबंधीचे सर्वसामन्यांचे कुतूहल शमण्यास मदत होते. मात्र, आकर्षण वाढते. मुलांच्या प्रश्नांना मानसशास्त्रीय उत्तरे, यशाची परिभाषा, वेळ वाचविण्याचे धडे, रागावर नियंत्रण कसे ठेवायचे, नात्यांचा शोध, निवृत्ती असे विषय हाताळले आहेत. स्किझोफ्रेनिया, मंत्रचळ अशा मानसिक आजारांवरही त्यांनी चर्चा केली आहे.