Summary of the Book
नीला सत्यनारायण
नीला सत्यनारायण यांचा हा जरी पहिला कथा संग्रह असला तरी साहित्याच्या प्रांतात त्यांचे नाव नवीन नाही. अत्यंत लोकप्रियअधिकारी आणि आता सेवानिवृत्तीनंतर लोकप्रिय लेखिका अशी त्यांची ओळख आहे .त्यांचे नऊ काव्य संग्रह आणि अठरा पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत .
त्यांचे 'महाराष्ट्र टाईम्स' आणि 'सकाळ' वर्तमानपत्रातले स्तंभलेखनही अतिशय लोकप्रिय झाले होते. त्याच लेखांची आता पुस्तकेही वाचकांना उपलब्ध आहेत .
'खऱ्या खुऱ्या गोष्टी ' या कथा संग्रहाचे शीर्षक यथार्थ आहे .त्यातली प्रत्येक गोष्ट खरी आहे .यातल्या अनेक कथा हृदयस्पर्शी आहेत .नीलाताईंच्या मते त्यांना भेटलेल्या प्रत्येक माणसाची एक कथा आहे .ती वाचणारा आणि समजून घेणारा फक्त भेटायला हवा .