यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अथक मेहनत, कष्ट यांसह अन्य गुणांच्या शिडीचाही वापर करावा लागतोच. हे कसे साध्य होऊ शकते याबाबत संजय आघाव यांनी ‘डॉन’मधून मार्गार्षण केले आहे. शीर्षकातील ‘डॉन’ हा शब्द येथे एखाद्या क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती, प्रामाणिकपणे, सद्वर्तनाने सर्वोच्च स्थानी पोचलेली व्यक्ती या अर्थाने घेतला आहे.
आयुष्यात ज्या गोष्टी स्वेच्छेने करायच्या असतात त्याचा श्रीगणेशा करण्यासाठी प्रथम ध्येय निश्चित करून नियोजन, आराखडा तयार केल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणे महत्त्वाचे असते. कोणतेही नवे काम सुरू करताना ‘हे आपल्याला जमेल का?’ अशी भीती असते; मात्र कामाचे स्वरूप ते कसे करायचे हे समजून घेतल्यास ही भीती नाहीशी होते.
भविष्याबद्दल सजग असणे, ही यशाची पहिली पायरी आहे. त्यानंतर व्यवहार प्रेरणा जोखीम, नकार, मनोबल, संघर्ष, अडथळे, कष्टरूपी भांडवल, विचार, तुलना, यश, अपयश, चिकाटी, त्याग, व्यसन, अनिश्चितता, आनंद, हव्यास, आत्मसन्मान, पैसा, हिशोब, व्यवस्थापन आदी टप्पे येतात. या सर्व विषयांवर मार्गदर्शन केले आहे.
‘डॉन’ या पुस्तकाचा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5274243542476321100