Summary of the Book
मुल कितीही मोठं झालं, तरी आई - वडिलांच्या दृष्टीनं ते बाळच रहातं. या बाळाला वाढवण्यात, जपण्यात
ते त्यांच्या आयुष्यातील मोठं आनंद मिळवत असतात. ते वाढविण्यातच का, त्याच्या जन्माच्या आधीपासूनच
आई - वडिलांनी काळजी घेणं जरुरीचं असतं.ही काळजी कशी घ्यावी, याचं समग्र मार्गदर्शन प्रा. वा. शि. आपटे,
डॉ. शं. चिं. सारंगधर आणि डॉ. विनिता पाठक यांनी या पुस्तकातून केलं आहे.
प्रसुतीपूर्व ते मुल १० वर्षाचं होईपर्यंत त्याच्या शारीरिक,मानसिक, वाढीची सर्व माहिती त्यांनी पुस्तकात दिली आहे.
गरोदरपणा ते बालजन्म, बाळाचे पहिले वर्ष,बाळाची प्रगती, आहार आजार, संगोपन प्रश्न, बौद्धिक विकास, वृत्ती - प्रवृत्ती,
बालकांच्या समस्या, उद्याचा मानव,मुलामुलींची नावे या दहा प्रकरणांतून भावी पालकांना मार्गदर्शन केले आहे..