Summary of the Book
डॉ अनुराधा औरंगाबादकर यांनी डॉ. ह. वि. सरदेसाई यांच्यावर लिहिलेले हे पुस्तक डॉक्टरांबद्दलचे विविध अनुभव सांगणारे आहे.
लेखिकेने तीन भागात या पुस्तकाची रचना केली आहे. डॉक्टरांकडे पेशंट म्हणून आलेला अनुभव अत्यंत वाचनीय असा आणि डॉक्टर पेशंटना कसे आधार देतात व त्यांना धीर कसा देतात याचा प्रत्यय येतो.
तिसऱ्या भागात विचारविश्व या सदरात डॉक्टरांची अनेक विषयावरची मते येतात. या विभागात 14 प्रकरणे आहेत. जीवनध्येय, मन, परमेश्वर संकल्पना, आत्मभाव ताण तणाव आणि मेंदू यासारख्या विषयावर डॉक्टरांनी आपले विचार व्यक्त केले आहेत.