Summary of the Book
'आत्मदीपो भव ' म्हणजे 'आपणच व्हावे आपला दिवा ' ही शिकावं गौतम बुडदांनी जगाला दिली. याचा आधार घेत गोव्यातील व्यावसायिक दत्त दामोदर नायक यांनी प्रगत विचार व विकासासाठी आवश्यक असलेल्या व्यक्तिमत्त्व विचार व व्यवस्थापनशास्त्र या विषयीचे आधुनिक विचार 'आत्मदीपो भावं तुन व्यक्त केले आहेत. संस्कारक्षम वयातील विद्यार्थी आणि व्यवस्थापनशात्राचा गंध नसलेल्या वाचकांसाठी हे पुस्तक सुलभ व सोप्या भाषेत लिहिले आहे. कष्टाविना , घाम गाळल्याशिवाय , बुद्धीचा वापर केल्याशिवाय श्रीमंत , सुखसंपन्न जीवनाकडे नेणारा कोणताही जादूचा दिवा नसतो , हे वास्तव यातून विविध कथांमधून ठरविले आहे.
कोणावरही विसंबून राहू नये, नियती , दैव , विधिलिखित या गोष्टीवर विश्वास न ठेवता यश मिळवण्यासाठी प्रयतवाद , नियोजन , जटील प्रश्न सोडवण्यासाठी मानसिक ताकद व उत्तम प्रतिकारशक्ती , योग्य आहार, व्यायामाने तयार केलेले सदृढ शरीर, प्रफुल्लित मनोवृत्ती , आशावादी व साकारात्मक दृष्टिकोन कसा असावा, याची सूत्रे गोष्टीरूपाने व प्रत्येक्षातील घटनांचे देऊन सांगितली आहेत.