Summary of the Book
माजोर
सत्तेची अभिलाषा माणसांत आणि प्राण्यात सारखीच असते. पाडसाला जोपासून त्यातला नर 'घडवून' आईलाही केवळ एक मादी ठरवून मागे सोडणारा काळवीट आणि एक उन्मत्त असा त्याचा प्रतिस्पर्धी यांच्यातल्या सत्तांतराची ही रोमांचक प्रतिकारात्मक कथा.
कलाकार: इला भाटे, शशांक शेंडे, समीर धामणगावकर
परागंदा
घटना आणि परिणाम हे नेहमीचेच समीकरण , परिणामांचे स्वरूप मात्र व्यक्तिपरत्वे भिन्न असते. शेजारी परागंदा होणं - घटना तशी साधीच! अनेक गूढ परिणामांना उलगडत श्रोत्यांच्या विचारांना वाट फोडणारी ही कथा.
कलाकार: गजानन परांजपे, पद्मनाभ पाठक, हर्षवर्धन दिक्षित, सौरभ सदावर्ते, वृषाली देशपांडे
आता आमोद सुनासि आले
जन्म आणि मृत्यू... अर्थात काहीतरी विलयाला जाण्याची वेदना आणि वेदनेतून पुन्हा निर्मितीचा वेध .. असं नियतीचं चक्र! रामजीचं सर्वस्व हिरावून घेणारी नियती... आणि त्या वेदनेतून, जणू काही हरवलेलं परत मिळवण्यासाठी नियतीशी समरसून झुंजणारा रामजी. त्याची ही हृदयस्पर्शी कथा.
कलाकार: गजानन परांजपे, सुधीर मोघे, हर्षवर्धन दिक्षित आणि सहकारी
वणवा
आपत्तीमधून स्वत:ला सावरत विजिगिषु वृत्तीनं आपण जगात असतो. आपत्ती- मग ती कोसळणारी वीज असो किंवा भीषण वणवा.. जंगलातला... व एखाद्याच्या मनातला...! अशाच आशावादाची ही अनुभूती...
कलाकार: सुधीर मोघे, राधिका देशपांडे आणि सहकारी