Hard Copy Price:
25% OFF R 320R 240
/ $
3.08
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
केतन पुरी लिखित मऱ्हाटा पातशाह हे पुस्तक अखंड हिंदुस्थानचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अस्सल छायाचित्रांच्यावर प्रकाश टाकणारे महाराष्ट्रातील बहुदा पहिलेचं पुस्तक असावे. आजवर शिवरायांच्या काल्पनिक चित्रांची जत्रा मनात साठवून पूजन करणार्यांना केतन पुरी यांनी दिलेली हि एक अलौकिक पर्वणी आहे. आपल्या राजांचे एकही अस्सल चित्र आपल्याकडे नसावे हि शोकांतिका जरी असली तरी त्याहून मोठी शोकांतिका हि हाती कि इतिहास संशोधक, लेखक, शिवभक्तीचा डंखा वाजविणारे गट तट आणि महाराजांच्या नावावर राजकारण, करणाऱ्या एकालाही आजपर्यंत जगभरातील अस्सल चित्रांचा मागोवा किंवा त्या बाबतीत माहिती उघड करावीशी वाटली नाही. वादग्रस्त मुद्दे उकरून काढून प्रसिद्धीच्या झोतात येण्याला शिवभक्ती समजणाऱ्यांसाठी केतन पुरींचे हे पुस्तक खरंच एक कानउघाडणी आहे हे नक्की.
शिवरायांच्या बाबतीत अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक सुरुवातीलाच वाचले पाहिजे हा माझा वैयक्तिक अट्टाहास असेल, कारण तर आणि तरच त्यांना छत्रपती शिवराय ही संकल्पना आणि तिचे मूळ समजेल. शिवरायांच्या बाबाबतीत रुजू असलेल्या अनेक मनघडांत हेवेदावे फोल करणारे हे पुस्तक म्हणजे संशोधनपर लेखनाचा आणि पुराव्यानिशी शिवरायांना सिद्ध करणारा मानबिंदू आहे.