Summary of the Book
विनोदाचा विविध बाजूंनी विचार करणाऱ्या या पुस्तकात विनोदी किस्से तर आहेतच, पण विनोदाचे प्रकारही समजावून देणारे लेखन आहे. हसायचं का, हे सांगणाऱ्या लेखांबरोबरच मराठीतील नामवंत साहित्यिकांनी केलेल्या विनोदी लेखनाचाही परिचय यात करून देण्यात आला आहे. स्मितहास्य करायला लावणाऱ्या विनोदापासून ते खळखळून हसायला लावणारे किस्से आणि वात्रटिका यामध्ये आहेत. पाचकळ विनोद किंवा कमरेखालचे विनोद यात अजिबात नाहीत. विनोदाचा विचार करून त्याची मीमांसा केली आहे, पण त्यात रूक्षपणा नाही. मन प्रसन्न करील असं हे लेखन आहे.