Summary of the Book
मूळ मराठी शब्दाला कधी उपसर्ग लागल्याने; कधी त्या शब्दाचे विशेषण, क्रियाविशेषण, क्रियापद या शब्दजातींत रूपांतर झाल्याने; तर कधी इतर शब्द जोडून होणारी संधी किंवा सामासिक शब्द यांचे अर्थासहित ज्ञानार्जन या मराठीतील पहिल्या शब्दार्थ कोशाने केले आहे. थोडक्यात, मूळ शब्दाचा व त्याच्या नात्यागोत्यातील इतर शब्दांचा सार्थ सहसंबंध उलगडून दाखवणारा हा शब्दकोश आहे. सुमारे 1400 शीर्षशब्द यामध्ये समाविष्ट केले आहेत.