Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
जमीन, नदी, जंगलं, पर्वत, पशु-पक्षी यासह सगळ्या नैसर्गिक भवतालात मिसळून गेलेलं प्राचीन लोकसमूहांचं आयुष्य आणि त्यांच्या आधारेच पिढ्यानपिढ्या जगत राहण्याची त्यांची इच्छा या सगळ्याच कथांमधून डोकावताना दिसते. या पारंपरिक कथांचा साचा जसा ठाशीव नसतो, तसा त्यांच्यातून डोकावणारा अर्थही ठाशीव नसतो. सांगणाऱ्याची-ऐकणाऱ्याची दृष्टी आपापल्या परीनं कथेतल्या शब्दांमध्ये अर्थ भरत असते. यातल्या काही कथा आपल्या परिचयाच्याही आहेत. आजवर अनेक वर्ष आपणही कदाचित एकाच नजरेनं त्या ऐकल्या-वाचल्या असतील. मी त्यांच्या गाभ्याशी असलेली निसर्गविषयक जाणीव स्पष्ट करण्याचा, रूढ अर्थापलीकडचं आणखी काही जाणून करण्याचा प्रयत्न केला आहे. काही कथांमध्ये ही निसर्गविषयक जाणीव अगदी स्पष्ट-स्वच्छ दिसते, तर काही कथांमध्ये ती दोन वाक्यांच्या-शब्दांच्या मधल्या अवकाशात दडून राहिली आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशातले लोकसमूह असले तरी या जाणिवेचा धागा सगळीकडेच सारखा आहे. विभिन्न प्रादेशिक-सांस्कृतिक अस्मिताही या कथांमागे उभ्या असल्या तरी सृष्टीच्या जन्माविषयी वाटणारं कुतूहल, त्याविषयी केलेला तर्क आणि निसर्गाशी असलेलं तादात्म्य सगळीकडे सारखंच आहे.