Summary of the Book
अलीकडील संवादक्रांतीच्या युगात कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, निवेदन आणि मुलाखत ही नवी क्षेत्र खुली झाली आहेत. जाहीर समारंभ, टीव्हीवरील मनोरंजनाचे कार्यक्रम, मुलाखतीचे कार्यक्रम यांसाठी सूत्रसंचालकांची, मुलाखतकारांची आवश्यकता असते. अलीकडे अशाकैः सूत्रसंचालकांनी, मुलाखतकारांनी या क्षेत्रात घट्ट पाय रोवून नाव कमावले आहे.
प्रा. अशोक चिटणीस आणि डॉ. शुभा चिटणीस यांनी या क्षेत्रातील नामांकित व्यक्तींशी संवाद साधून त्यांचं मनोगत जाणून घेतलं आहे. सुधीर गाडगीळ, मंगला खाडिलकर, अरुण नुलकर, शैला मुकुंद, प्रदीप भिडे, भाऊ मराठे, उत्तरा मोने, समीरा गुजर-जोशी, अशोक हांडे ही वानगीदाखल नावे. या सगळ्यांचे व्यक्तिमत्व, कामाची पद्धत, हातोटी याची माहिती पुस्तकातून मिळते.