Summary of the Book
'द हिंदू' या निष्पक्ष दैनिकाने ज्यांचा उल्लेख 'गझलसम्राट सुरेश भट यांची मशाल घेऊन पथदर्शक बनलेले गझलकार', असा केला, झी वाहिनीनेचे मुख्य संपादक विजयजी कुवळेकर ज्यांना 'भट यांचे अंतरंग शिष्य' म्हणाले, ते गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या निवडक नव्या कोऱ्या गझलांचे हे पुस्तक. अत्यंत वेगळ्या कल्पनांचा खजिना असलेले, गझल या काव्यप्रकाराच्या तंत्राचे कायदे पाळूनही आशयाचा प्रश्न जिथे येतो तिथे मंत्रच महत्वाचे मानणारे, अनेक गझलकार घडविणारे, उर्दूचा सखोल अभ्यास करणारे निफाडकर यांच्या या गझला रसिकांना नक्कीच आवडतील.