Summary of the Book
वीस वर्षापूर्वी डॉ. स्पेन्सर जॉन्सन यांनी एक कथा सांगितली होती. चक्रव्यूहात अडकलेल्या दोन पात्रांची कथा होती ती ! या कथेमुळे, भयाचा आणि बदलाचा सामना कसा करावा, हे जगभरातील वाचकांना समजलं त्यामुळेच या कथेनं सर्वांच्या हृदयात घर केलं.
या पुस्तकाच्या २.८ कोटी प्रतींची विक्री झाल्यानंतर डॉ. जॉन्सन आपल्या लाडक्या पात्रांना परत एकदा घेऊन येत आहेत.
या पुढच्या भागातील ही आश्चर्यकारक कहाणी तुम्हाला तुमच्या जीवनातील चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच मदत करेल.