Summary of the Book
प्रत्येक धर्मामध्ये तीर्थक्षेत्रांना महत्व आहे. आयुष्यात एकदा तरी या ठिकाणांना भेट देण्याची इच्छा अनेकांना असते. ख्रिस्ती समाजासाठी पवित्र असणाऱ्या इस्त्राईल देशाला भेट देऊन येशू ख्रिस्ताच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या भूमीचे दर्शन रेव्ह. आशाकांत रामटेके यांनी घेतले.
तेथील यात्रेचे प्रवासवर्णन त्यांनी 'पवित्र भूमी यात्रा ' मधून केले आहे. जॉर्डन - इस्त्राईल-पॅलेस्टाईन व इजिप्त या चार देशांतील अनेक गावांचे, ठिकाणांचे वर्णन, त्याचा इतिहास, त्याचे महत्त्व त्यांनी सांगितले आहे.
जॉर्डनमधील नेवोचा पर्वत, मोषेचा कबर, पिसबा शिखर, मृत समुद्र, मडाबा इस्त्राईलमधील जेरुसलेम, टायबेरिस, नाझरेथ, चर्च ऑफ अँनन्शिएशन, काना गाव गालील समुद्र, माउंट ऑफ ब्युटीटयूड, कफर्णहूम, मेन्सा ख्रिस्ती, मेगीड्डो, हायफा, यापो, जैतुनचा डोंगर, वेस्टर्न किंवा वेलिंग वॉल, दविदाचा राजवाडा, चर्च ऑफ असेन्शन, व्हाया डोलोरेसा म्हणजे येशू ख्रिस्त दु:ख सहन करीत गेला ती वाट, पॅलेस्टाईनमध्ये येशू ख्रिस्ताचे जन्मस्थळ असलेले बेथेलहेम, माउंट ऑफ टेम्पटेशन, यारीहो, कुमरान केव्ह्ज, बेथानी, इजिप्तमधील गिझा पिरॅमिड, अशा ४८ पवित्र ठिकाणांची यात्रा यातून घडते.