Summary of the Book
गोड खाणार त्याला देव देणार हि या पुस्तकाची कॅच लाइन बदलून खरे तर गोड खाणार त्याला विष्णू मनोहर पदार्थ शिकवणारा अशी करायला हवी. कारण त्यांनी या पुस्तकात तब्बल १०६ गोड पदार्थ बनवायला शिकवले आहे. त्यात नेहमीच पक्वान्ने तर आहेतच, शिवाय फ्राड आईसक्रिम, ड्रायफ्रुट, क्रीम कोण, कणकीचे दुध लाडू, स्ट्रोबेरी कटूस, मगज लाडू, ऑरेंज छेना मुरकी, पपईचा हलवा, गोडाचे भानोले आदी आगळेवेगळे पदार्थही शिकायला मिळतात.
एवढेचं नव्हे, तर सुकरउंडे, सांजणी, शिरमाल, पोटालू, शानी, करदंड, बेबिंका, सकर दंडी, हुणी, ठेकूआ, मखना पंजीरी, अशा गंमतशीर नावांच्या पाककृतीही त्यांनी सांगितल्या आहेत. याशिवाय पाक हमखास जमण्यासाठी काय करावे याचे उपयुक्त मार्गदर्शनही ते करतात.