Summary of the Book
आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या खेड्यातील मुलाने भव्य स्वप्न पहिले आणि कोणत्याही सुविधा नसतानाही अथक परिश्रमाने बांधकाम व्यवसायात भरारी घेतली. अकुलखेडे गावातील प्रकाश पाटील नाशिकला नोकरीनिमित्त आले. वडिलांची शिस्त, संस्काराची शिदोरी जवळ होती. एक सायकल, ३१०० रुपये व गादी वडिलांनी दिली आणि पाटील यांचा जीवनप्रवास सुरु झाला. दोन तीन कंपन्यात नोकरी करून अनुभव घेत त्यांनी अँसेटोन उत्पादनाचा व्यवसाय सूरु केला.
त्यात जम बसला तरी बांधकाम व्यवसाय त्यांना खुणावत होता. संधी मिळताच त्यांनी त्यात पदार्पण केले. सुरवातीला निराशाजनक अनुभव आले तरी संयम, चिकाटी न सोडता त्यांनी त्यांच्या 'घरां'साठी ग्राहक शोधले. त्यानंतर त्यांच्या यशाचा आलेख उंचावत गेला. एक दिवस त्यांच्या स्वप्नातील बीएमडब्ल्यू दारात उभी राहिली. पाटील यांची ही प्रेरणादायी कहाणी 'सायकल ते BMW एक यशोगाथा - श्री प्रकाश पाटील' मधून श्वेता गानू यांनी सांगितली आहे..