Summary of the Book
संस्कृती या सूत्राशी निगडित असलेल्या बहुतांश लेखांतून व्यक्त होणारा संवेदनाचा अंक. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा हा पहिलाच दिवाळी अंक परिसंवादांमधून मराठी संस्कृतीच्या विविध पैलूंवर भाष्य करणारा आहे. ‘आदिवासींचा ज्ञानकोश’ या संशोधन प्रकल्पाची या अंकात घेतलेली दखल प्रशंसनीय! ‘इवलेसे रोप’ या बाल विभागातून मुलांची अभिव्यक्ती मुलांच्याच शब्दांत मांडण्यात आली आहे. स्त्रियांना आर्थिक-सामाजिकदृष्टय़ा सक्षम बनविणार्या बचत गटांच्या कार्याचा लेखाजोखा अंजली कुलकर्णी यांनी त्यांच्या लेखातून मांडला आहे. प्रा. रा. ग. जाधव, अच्युत गोडबोले, सुलभा देशपांडे, अवधूत परळकर, श्रीकांत इंगळहळ्ळीकर अशा मान्यवरांच्या संवेदनांचे प्रतिबिंब या अंकात पडले आहे.