Summary of the Book
मन, मन असे जे आपण म्हणतो, ते म्हणजे नेमके काय? मनाची व्याख्या कशी करावी? मन म्हणजेचं हृदय असा सर्वसामान्य समज असताना मन हे हृदयात नसून मेंदूशी निगडीत आहे, असे शास्त्रज्ञाने मांडलेले लगेच मान्य करायचे का?
यशापयशाची आपल्या मनातील समीकरण, नातेसंबंधावरील प्रभाव, अपराधगंडातून मनाला होणारा त्रास, कष्टासोबतच मनाच्या सकारात्मकतेची गरज... अशा अनेक विषयांवर डॉ. राजेंद्र बर्वे यांनी 'मानसिका... मनाच्या अंतरंगात' या पुस्तकात अगदी उपयोगी मार्गदर्शन केले आहे.
कोणत्याही व्यक्तीला वर्ज्य नाही, असा हा विषय असून तो मांडलाही अगदी नेटक्या शब्दांमध्ये आहे. डॉ. बर्वे यांची लिखाणाची शैली नेहमीप्रमाणेच सहजसोपी आणि थेट भिडणारी आहे. प्रकरणे छोटी आणि संवादी असल्याने खिळवून ठेवतात. प्रत्येक वाचकाला 'रिलेट' करतील, अशी उदाहरणे असल्याने ती अत्यंत प्रभावी झाली आहेत. मनोविकास प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.