Summary of the Book
पेशाने प्राध्यापक असलेले एन. डी. आपटे यांनी शब्दांची देणगी लाभली आहे. त्यामुळेच प्रदीर्घ काळ ते विविध विषयांवरील लेखन करत आहेत. अनेक वृत्तपत्रे व नियतकालीकांमधून त्याला प्रसिद्धी मिळाली आहे. सभोवतालची माणसे, घटना, प्रसंग, यांतून विषय शोधून त्यांनी लघुकथा, प्रसंगकथा आणि चरित्रकथा लिहिल्या आहेत. सामाजिक, कौंटुंबिक, आरोग्य, शिक्षण, मानवी वृत्ती, मन या घटकांवर आधारित या कथांमधून बोधही मिळतो, मनोरंजनही होते व अस्वस्थ व्हायलाही होते.
चरित्रकथांमधून मदर तेरेसा, एडवर्ड केनेडी, अप्सरांवर संशोधन करणाऱ्या डॉ. लिली जोशी, त्यांच्यागावाकडचे कवी पांडुरंग उर्फ आबा, फॅमिली डॉक्टर मेघश्याम नारायण जोग, त्यांचे समाजसेवक वडील दिगंबर उर्फ अप्पासाहेब आपटे यांचे व्यक्तीचित्र त्यांनी उभे केले आहे. प्रसंगकथा या खऱ्या प्रसंगावर आधारित आहेत. म्हणूनच हा कथासंग्रह नावीन्यपूर्ण आहे.