Summary of the Book
रत्नाकर धर्माधिकारी यांच्या विनोदी लेखांचे हे पुस्तक निश्चितच हसू आणते. ओढूनताणून किंवा कृत्रिम विनोदाचा प्रकार इथे नाही. सहजसरळ असा हा विनोद वाचकाच्या चेहर्यावर हास्य फुलवतो. 18 लेखांमधून लेखक जीवनातील विसंगती, तसेच सभोवतालची परिस्थिती यावर नेमके भाष्य करत कोपरखळ्या मारतो. तेराव्या राशीचे लोक आणि आमची पण थोडी भाषाशुद्धी हे लेख चांगले जमलेले आहेत.