Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/ $
2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
शिवाजी विद्यापीठात उपकुलसचिवपदी कार्यरत असलेल्या डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव आणि शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव म्हणून आपल्या प्रशासकीय कामकाजाचा ठसा उमटविलेला आहे . त्यापूर्वी त्यांनी भौतिकशास्त्राचे अधिव्याख्याता म्हणून पाच वर्ष काम पहिले आहे .डॉ. शिंदे एम.एस्सी ( भौतिकशास्त्र ) परिक्षेत शिवाजी विद्यापीठात सर्वप्रथम आले होते . क्रायोजेनिक्स विषयातील संशोधनासाठी प्रा. एम.सी. जोशी पुरस्काराचे ते सहमानकारी आहेत . त्यांनी क्रायोजेनिक्स अँड इट्स अॅप्लीकेशन्स या पुस्तकाचे सह्संपादन आणि सक्सेस गाईड फॉर एमएचसीईटी या पुस्तकाचे सहलेखन केले आहे . वृक्षप्रेमी नागरिक म्हणून त्यांची ओळख आहे .शिवाजी विद्यापीठातील 'जलयुक्त विद्यापीठ' उपक्रमाद्वारे विद्यापीठास पाण्याबाबत स्वयंपूर्ण बनवण्यात त्यांची प्रमुख भूमिका आहे . 'एकांकाचे मानकरी' आणि 'असे घडले भारतीय वैज्ञानिक' या वैज्ञानिक पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी मराठी विज्ञान साहित्याच्या क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे . दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा अत्यंत प्रतिष्ठेचा कृ. गो. सूर्यवंशी पुरस्कार तसेच मिरजेच्या चैतन्य शब्दांगण संस्थेनेही या पुस्तकास पुरस्कार दिला आहे. कृषिक्रांतीचे शिलेदार , हिरव्या बोटांचे किमयागार , वैद्यकीय प्रवेश परीक्षा मार्गदर्शनपर लेखमाला आदी सदरांचे त्यांचे त्यांनी लेखन केले आहे .