(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
'राजतरंगिणी म्हणजे राजांची नदी. राजवंशाचा प्रवाह. काश्मीरच्या भूमीवर आदिकाळापासून जे राजे होऊन गेले, त्यांच्या राजवटींचा हा काव्यमय इतिहास आहे. कल्हण कवीने बाराव्या शतकात रचलेला हा ग्रंथ म्हणजे भारतात आजपर्यंत उपलब्ध झालेला इतिहास म्हणावा अशा योग्यतेचा एकमेव प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या मराठी अनुवादामागची भूमिका 'राजतरंगिणी' पाठशुद्ध संशोधित आवृत्ती सिद्ध करण्याची नाही. काश्मीरकडे केवळ एक पर्यटनस्थळ म्हणून पाहणाऱ्या माणसांना भूमीला प्राचीन वारसा उमगून यावा असा एक हेतू या अनुवादामागे आहे. काश्मीरच्या भूमीला समजून घेण्याची, तिच्यावर नांदणाऱ्या जनसमूहाची स्वभाव - प्रकृती जाणून घेण्याची, तिने जे पहिले आणि साहिले आहे त्यातून तिची घडण कशी विशिष्ट प्रकारची झाली आहे. याचे भान ठेवण्याची गरज आज तीव्र झाली आहे. तिच्या मुळातल्या निरागस पण विद्रोही प्रवृत्तीची जाणीव तिच्याशी स्नेहबंध निराळीं करताना ठेवणे अत्यावश्यक आहे आणि तिची ती प्रवृत्ती आणि अस्मिता हा हजारो वर्षाच्या इतिहासाचा परिपाक आहे. याची खूणगाठ बंधनेही जरुरीचे आहे. ही भूमी केवळ पर्यटकांची रंजनभूमी नाही. इथे नांदणाऱ्या माणसांनी सनातन मानवी जीवनाच्या पाटावर आपली एक जागा निराळीं केली आहे आपले मूलाधाराही निर्माण केले आहेत. त्या घटितांचा उलघडा काश्मीरच्या राजवंशाच्या इतिहासातून आपल्याला करता येईल आणि इथला निसर्ग, इथली माणसे, इथली वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती , इथल्या राजवटी आणि त्यांनी जन्माला घातलेल्या भल्या - बुऱ्या प्रथा- परंपरा या सर्वांचा रोमहर्षक अनुभव या काव्यग्रंथातून येईल अशा विश्वासाने हा अनुवाद वाचकांसमोर ठेवला आहे.