Summary of the Book
वेलभाज्यांची माहिती, लागवड पद्धत, हंगाम, बियाणांची निवड अशी उपयुक्त माहिती वेलवर्गीय भाजीपाला या पुस्तकातून प्रा. आनंद गिरी यांनी सविस्तरपणे दिली आहे. काकडी, तांबडा भोपळा, दुधी भोपळा, दोडका, कारले, परवल, पडवळ, तोंडली, घोसाळी, कलिंगड, खरबूज या भाज्याशिवाय टिंडा, कोहळा, करटोली या आपल्या पाहण्यात नसणाऱ्या भाज्यांचीही माहिती दिलेली आहे. सर्वच वेलवर्गीय भाज्यांतील औषधी गुणधर्म, भाजी लागवड करण्यासाठी उपयुक्त जमीन, त्यासाठीचे हवामान, कोणत्या हंगामात लागवड करावी याची सविस्तर माहिती अगदी सोप्या सोप्या शब्दांतून प्रा. गिरी यांनी दिलेली आहे. शिवाय भाजी लागवड पद्धत, कोणती खते किती प्रमाणात वापरावीत, पिकासाठीचे पाण्याचे व्यवस्थापन, आंतरमशागत याचीही माहिती विस्तृतपणे दिलेली आहे.