Summary of the Book
देवाचे स्तवन, स्तुती करीत देवाची कृपा कायम राहावी, यासाठी आरती केली जाते. आरतीमध्ये मंगलारती, काकड आरती, माध्यान्ही आरती, सायंकालीन आरती, धुपारती, शेजारती असे अनेक प्रकार आहेत.
रामदास स्वामी यांनी लिहिलेली गणपतीची आरती आजही विधिवत पूजेनंतर भक्तिभावाने, श्रद्धेने म्हटली जाते. 'आ' म्हणजेपर्यंत व 'रती ' म्हणजे एकरूपता; म्हणजेच 'एकरूप होईपर्यंत प्रार्थना म्हणजे आरती', अशी आरतीची फोड डॉ. मधुकर मोकाशी यांनी केली आहे.
त्यांनी संपादित केलेल्या 'आरती महाकोश 'मध्ये वारकरी संप्रदायातील संत, अन्य संत, स्वामी समर्थ संप्रदाय, शैव संप्रदाय, निंबाळ संप्रदाय, स्वामी स्वरूपानंद संप्रदाय, गुरुमाता - गुरुभगिनी, निसर्ग, वास्तू व भारतीय महापुरुष दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय अशा सुमारे पाऊणशे आरत्या आहेत.
व्यासपूजा, आदि शंकराचार्य, याज्ञवल्क्य, निवृत्तीनाथ, चोखोबा, मोरया गोसावी, अवतार मेहेरबाबा, शंकर महाराज, बीडकर महाराज, स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज, सिद्धरामेश्वर महाराज, गुरुलिंग जंगम महाराज, गणेश महाराज, स्वामी स्वरूपानंद, प्रेमानंदी माता इंदिराबाई केळकर, कलादेवी माता, भगवद्गीता, औदुंबर, गंगा नदी अशा वैविध्यपूर्ण आरत्या या संग्रहात आहेत.