तो तिच्याचसाठी...
दोन जीवांचे विश्व वेगळे, प्राक्तन मिलनातून उजळे.
eBook Price: 25% OFF  R 550 R 412 / $ 5.28
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
एका वेगळ्या विषयाचा आणि एका सामाजिक प्रश्नाचा वेध घेणारी गौरी साखरे यांची ही कादंबरी आहे. या कथेचा नायक समलिंगी नसतो, मात्र लहान असताना समलिंगी अत्याचाराला बळी पडतो. तेव्हापासून तो स्त्रियांचा तिरस्कार करू लागतो.

स्त्रियांपासून लांब राहतो. पुढे त्याला एक मुलगी भेटते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. एकीकडे स्त्रियांविषयीचा तिरस्कार आणि दुसरीकडे या मुलीविषयी वाटणारे आकर्षण अशी त्याची द्विधा मनस्थिती होते. ही मनःस्थिती लेखिकेने कादंबरीतून रंगविली आहे. त्याच वेळी त्याच्या आयुष्यात एक समलिंगी पुरुष येतो. आणि त्याला नायकाविषयी आकर्षण वाटू लागते; परंतु नायकाला समलिंगी संबंधांचे आकर्षण वाटत नाही, त्याला ती मुलीचीच ओढ वाटत असते. साधारणतः असे उत्कंठावर्धक कथानक आहे
Book Review
Write a review

Geetanjali Suryavanshi
27/02/2016

अप्रतिम. परिपूर्ण कादंबरी. गेले अनेक महिने लागून राहिलेली उत्कंठा संपली. काय आणि किती लिहावे ते समजून येत नाही . प्रचंड मोठा आणि गंभीर विषय लेखिकेने सहज लीलया पेलवला आहे . त्याबद्दल सर्वात आधी त्यांचे आभार . पुरुषावरील बलात्कार हा अगदी अगम्य विषय . पण इतक्या सहजतेने आणि कुठेही अश्लीलता येऊ न देत त्यांनी मांडला आहे त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले पाहिजे . एक साधी सरळ सामान्य मध्यम वर्गातील मुंबईत राहिलेली मुलगी आणि अत्यंत देखणा असा इटालियन कोट्याधीश कुटुंबातील अमेरिकन मुलगा. अगदी अशक्य अशी ही प्रेम कहाणी (?) तसं पाहायला गेलं तर हे पुस्तक प्रेमकहाणी या प्रकारात येत नाही.अत्यंत वेगळा विषय. कादंबरीत कोणतेही पात्र जबरदस्तीने घुसवलेले नाही . प्रत्येकाची व्यक्तिरेखा अगदी खरी असल्याप्रमाणे डोळ्यांसमोर उभी राहते . पुस्तकात कोठेही भडकपणा दिसत नाही . दिसते ते लेखिकेचे ज्ञान आणि दांडगा अभ्यास . किमान महाराष्ट्रातील विद्यापीठांनी BA किंवा MA च्या अभ्यासक्रमाला लावावी अशी ही कादंबरी . मराठी कादंबरी विश्वात या कादंबरीच्या येण्याने एक नवीन क्रांती आणली आहे हे नक्की . बाकी वाचक सज्ञ आहेतच .
Najuka Kir
02 Jun 2016 05 30 AM

कादंबरीचा विषयही अतिशय नाविन्यपूर्ण आणि मराठी कादंबरी विश्वात न आलेला आहे.कथेच्या नायकावर लहान वयातच शाळेतील क्रीडा शिक्षकाकडून झालेला शारीरिक अत्याचार..त्याची माहिती मिळालेल्या सिनियर विद्यार्थ्यांकडूनही नंतर त्याचा 'वापर' होणे..या सगळ्याचा नायकाच्या बालमनावर होणारा विपरीत परिणाम..पुढे वय वाढत असताना तारुण्यसुलभ भावनांचं त्याच्या मनातील द्वंद्व..स्त्रीसहवासाची भीती..समलिंगी आकर्षणाची शंका..त्यामुळे त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्वावर आणि संपत्तीवर भाळून त्याच्या जवळ येवू पाहणाऱ्या प्रत्येक तरुणीपासून त्याचे लांब राहणे..पुढे मग एका अंतरराष्ट्रीय शिबिराच्या निमित्ताने संपर्कात आलेल्या एका सुंदर,समंजस,हुशार भारतीय मुलीवर त्याने मोहित होणे..परंतु अंतर्मनातील गंडाने तिच्याकडे तशी कबुली न देणे..त्यांचे पुन्हा दूर जाणे..मधल्या काळात अनेक बऱ्या-वाईट घटना घडणे..आणि.परंतु अतिशय चित्तवेधक अशी ही कादंबरी आहे. युरोपियन राष्ट्रांमधील संस्कृती,त्यातील बारकावे,तिथली निसर्गसंपदा,त्यांची मानसिकता हे सगळं अतिशय वेधक पद्धतीने आपल्यासमोर उभं केलंय.त्यांची लेखणी अतिशय प्रभावी आणि प्रवाही आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat