हेलपाटा
Helpata Kadambari Novel P. R. Group Of Publication Tanaji Dharane कादंबरी तानाजी धरणे पी. आर. ग्रुप ऑफ पब्लिकेशन हेलपाटा
eBook Price: 7% OFF  R 225 R 210 / $ 2.69
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Book Review
Write a review

Aishwarya Pise
08 Mar 2023 05 30 AM

हेलपाटा ही अतिशय संघर्षमय कादंबरी आहे . सवांनी वाचावी व त्यातून खूप काही गोष्टी घ्याव्यात .काका तुम्हाला पुढील साहित्यकृतीसाठी खुप खुप शुभेच्छा
Dipali Vinayak Berde
31/07/2023

सुंदर कांदाबरी खूप छान
pandurang jhadhav
31/07/2023

Halpata is very nice book
Babaro madavi
31/07/2023

अभिप्राय ******** हेलपाटा ही आत्मनिवेदनात्मक कादंबरी तानाजी धरणे यांच्या धगधगत्या जीवनाचा वेध घेते.गरीब परिस्थीतीच्या व्यथेतुन वादळात ऊभा झालेला लेखक पैदल चालुन तळपायाला फोड आलेल्या वास्तवातुन पोळुन निघाला.लहाणपणी शिक्षण घेतांना डोक्यावर भाजीचं टोपलं फीरवुन भाजी विकणारा लेखक जीवनाचे हेलपाटे सहन करीत दुनियेच्या बाजारात शिक्षण घेवून क्षीतिजा पर्यंत पोहचला.हृदयाला हलवुन सोडणारे प्रसंग हृदयात थेट शिरतात आणि प्रस्थापित व्यवस्थेला असमानतेबध्दल प्रश्न विचारतात.तानाजी धरणे यांची हेलपाटा कादंबरी सुन्न मनाने माणसं जागविणारी अशी वाचनिय कादंबरी आहे. —*बाबाराव मडावी,आकांतकार
अल्पना जगदाळे
30/07/2023

" हेलपाटा " या तानाजी धरणे लिखित कादंबरी विषयी थोडक्यात ....! बालवर्गमित्र तानाजी तुझे " हेलपाटा "हे पुस्तक मी वाचले. अतिशय सुरेख शब्दांकन👌 आघात अशी लेखन शैली🙏 चा अनुभव आला. एवढे लेखन करणं ही काही सोपी गोष्ट नाही याचा प्रत्यय आल्यापासून रहात नाही👍 जिंदगीच्या धावपळीचा हेलपाटा, कमालीचे दारिद्र्य, वडिलांचे अपार कष्ट, शालेय जीवनातील ससे होलपट, प्राणीमात्रांवरचे प्रेम व त्यांच्या प्रति असलेले ऋण व्यक्त करणे ,मित्र परिवारांचा नामोल्लेख व शिक्षक किंवा सहकार्यांचे ऋणनिर्देश अशा अनेक विविध गोष्टींचा परिपाक तुझ्या या पुस्तकात आहे👍 पहिल्यांदाच मला समजलं की जगात एवढ्या अडचणी किंवा पोटासाठी चा संघर्ष असू शकतो परंतु जेव्हा तुझे मोठे बंधू अण्णांनी 23 जुलै 1998 रोजी तुला नोकरीचे पत्र देऊन" बापू आज पासून तुझी डोक्यावरची पाटी गेली "असे केलेले शब्दांकन त्यावेळेस खरंच तानाजी खूप गहिवरून आले आणि डोळ्याच्या कडा अश्रू थांबवू शकल्या नाहीत🙏 शेवट गोड झाला👍 तुझे आत्ताचे आयुष्य सुख समृद्धी व भरभराटीचे आहे याचा खूप आनंद होत आहे खरंच तुझ्या संघर्षाला पारावार नाही आणि नशिबासमोर कुणाचे काहीच चालत नाही या गोष्टीची प्रचिती आल्यापासून राहत नाही पी . आर ग्रुप आॅफ पब्लिकेशन वरुड अमरावती यांनी छान पुस्तकाची मांडणी केली असुन श्री . शिरिष घाटे सर यांनी साजेसे मुखपृष्ट सजवले आहे तसेच पाठराखन ख्यातनाम लेखक श्री .बाबाराव मडावी यांनी केले असुन श्री. दत्ताञय मानुगडे यांनी प्रस्तावना लिहीली आहे .👍शाळा आणि शिक्षण हेच तुझ्या यशाचे हक्कदार आहे🙏 "हेलपाटा " हे अतिशय सुंदर पुस्तक 🙏 " कादंबरी " - हेलपाटा लेखक - तानाजी धरणे प्रकाशन - पी . आर. ग्रुप आॅफ पब्लिकेशन वरुड अमरावती सौ. अल्पना पालांडे/ जगदाळे माध्यमिक शिक्षिका सुपा हायस्कुल पुणे .
Ranjeet vasant lavate
30/07/2023

लेखक धरणे सरांनी खुप छान कादंबरी लेखन केली आहे. प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी कादंबरी आहे. तुम्हांला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा सरजी 🙏
फोजमल पाखरे सहशिक्षक उमरड
30/07/2023

फोजमल पाखरे सहशिक्षक प्रा. शाळा उमरड करमळा, सोलापुर """"""""""""""""""""""""""""""" " हेलपाटा " कादंबरीच्या निमित्ताने """"""""""""""""""""""""" प्रिय विद्यार्थी तानाजी, 32 वर्षापुर्वीचा काळ डोळ्यापुढुन तरळत जाताना १९९० साल आठवले .तू सातवीला शिकत होता .मी तुझा वर्गशिक्षक , माझी नोकरीची पहिली शाळा ." श्री भैरवनाथ विद्यालय करडे ता.शिरुर .जि .पुणे ". कै .बाबुराव घोलप साहेबांच्या त्यागाने पावन झालेली " पुणे जिल्हा मंडळ ही संस्था लाखो बहुजनांच्या मुलांच्या आयुष्याचं सोनं करत आहे .मी ही तुझ्यासारख्या संघर्षाच्या चरख्यातुन प्रवास करुन आलो होतो . तानाजी तू वर्गातला अतिशय हुशार , चुणचुणीत मुलगा , पण परिस्थितीने हतबल झालेला . बालपण करपलेला, पण तरीही जिद्दी , होतकरु अन संघर्षाशी दोन हात करणारा . तु तुझ्या पहिल्या कवितेची वही मोठ्या धाडसानं मला दाखवलीस मी त्या कविता वाचल्या , खुप छान होत्या .तुझ्या पाठीवर थाप टाकली त्यानंतर तु मला ३२ वर्षांनी मोठा साहित्यिक म्हणुनच भेटलास , खुप खुप धन्य धन्य वाटले ...! कविता करुन कोणाचे पोट भरत नाही पण तुझ्या कवितांनी अनेकांची हृदये माञ भरुन आली .तुझ्या खडतर आयुष्याच्या जखमा माञ भरुन आल्या .ओल्या भावणांची खाचखळगी माञ पुरेपुर भरुन आली .वेदनांनी आणि भावनांनी दाटलेल्या वाटा मोकळ्या करण्यासाठी तुझ्या मदतीला ' शब्द ' धावून आले आणि शब्दांची फुले तुझ्या जीवनात सुगंध दरवळत आहेत . तुझ्या जीवनातील संघर्षाच्या "हेलपाट्यात " तुझी प्रतिभा इतकी ताजीतवानी राहिली ती तुझ्या संघर्षाची साक्षच देत आहे . संघर्षातुन तु इतिहास घडवलास ,आव्हानांचं ओझं पेलल्यामुळे तुझ्या कर्तूत्वाचे बाहु बळकट झाले . संघर्षाला आव्हान दिल्यामुळे तुला ' वादळातील दिवा 'होता आलं , पायवाटेने रक्ताळलेल्या पायांनी तू धावलास म्हणुन तुला " राजमार्ग " सापडला . काळ्या आईच्या पोटातुन लखलखणारं बावनकशी सोनं जन्माला येत हे तुझ्या आत्मकथनानं सिद्ध होतयं. घामानं भिजलेलं शरीर अनं मन कोणापुढे लाचार होत नसतं हेच तुझ्या " हेलपट्यातुन दिसुन येतयं . काट्यांनी भरलेल्या वनातुन चाललास म्हणुन तुला केवढ्याचा सुगंध भेटला .तुझ्या लेखनातील शब्द नि शब्द ग्रामीण भागातलं अठराविश्व दारिद्र्य ,दु:खाचा ,कष्टाचा , त्यागाचा हुंदका बनुन बाहेर पडलेला आहे . शासकीय सेवेत असतानाही तुझ्या भावना संवेदनशील आहेत .माणसात माणूसपण तू शोधत रहातोस . असाच लिहीत रहा कवी ,गीतकार तु खुप मोठा हो तुझ्या प्रतिभेला असेच भावनांचे धुमारे फुटोत अन तू यशकिर्तीच्या परमोच्च शिखरावर आरुड होऊन दु:ख आणि वेदनांची फुंकर शोषणमुक्तीच्या मार्गाने घेऊन एक नवी वाट आणि पहाट निर्माण कर .....!!!! " हीच शुभेच्छा " फोजमल किसन पाखरे प्रा . शि . उमरड ता. करमाळा जि . सोलापुर मो .9604817551
Sandip Dharane
29/07/2023

हेलपाटा कादंबरी नुकतीच वाचण्यात आली . हेलपाटा ही अतिशय हृदयस्पर्शी व संघर्षमय कादंबरी आहे . सवांनी वाचावी अशिच कलाकृती आहे . बापुंना पुढील साहित्यकृतीसाठी खुप खुप शुभेच्छा
pushpa dube
28/07/2023

शृजनशिल लेखक प्रा विजयकुमार जोरी ... (सेनि प्राचार्य)लोणावळा पुणे यांनी " हेलपाटा " कादंबरीला दिलेल्या अतिशय बोलक्या व हृदयाच्या ठाव घेणार्‍या प्रतिक्रिया ... कवी / गीतकार तानाजी धरणे यांचे यापुर्वी " शेताच्या बांधावर " "सांजवेळ "व " स्वप्नचिञ हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले असुन त्यांचा चौथा काव्यसंग्रह " चांदणं पेरीत जाऊ " हा अध्ययन बुक या पब्लिकेशनद्वारे प्रकाशनाच्या वाटेवर आहे . तसेच त्यांची हेलपाटा हे पी आर ग्रुप वरुड अमरावती या प्रकाशनामार्फत प्रकाशित होत आहे . प्रकाशणापुर्वीच या साहित्यकृतिला अनेक मान्यवर लेखकांच्या खुप सुंदर प्रतिक्रिया आल्या आहेत ....अशीच एक प्रतिक्रिया संवेदनशिल लेखक प्रा . विजयकुमार जोरी (सेनि प्राचार्य)यांनी आपले मत स्पष्ट केले ... प्रकाशनाच्या वाटेवर असणाऱ्या आपल्या 'हेलपाटा' या कादंबरी साठी मनपूर्वक शुभेच्छा. ग्रामिण धाटणीची ही कादंबरी वाचकांच्या मनावर निश्चितच अधिराज्य करील आणि लेखक म्हणून आपणास अत्युच्च शिखरावर नेईल. आपल्या जीवनातील अपरिमित संघर्षाच्या प्रत्यक्षानुभूतींचा हा पट शब्दरुप करताना आपण केलेली भावनाप्रधान मौलिक शब्दसुमनांची उधळण कादंबरीचं सौंदर्य खुलवण्यास कारणीभूत ठरत आहे. भरजरी शब्द, लाघवी ग्रामिण भाषा, आत्मिय नाती आणि नात्यांतील कंगोरे, घटनाक्रम व त्यांची गुंफण सारंच विलोभनीय आहे. काव्य लेखन, काव्य वाचन, गीत गायन यात आपला हातखंडा आहेच मात्र या आत्मचरित्राच्या रुपाने आपण एक उत्कृष्ट लेखक साहित्यिक म्हणून उदयाला येत आहात हे आपल्या जीवनमार्गातील दिव्य संचित आहे. एक बहुआयामी कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी असल्याचा प्रत्यय आपल्या कार्यकर्तृत्वातून येतो. नोकरी मिळेपर्यंतचा आपला, आपल्या कुटुंबाचा पराकोटीचा संघर्षमय कालखंड ही या लेखनामागील प्रेरणा असल्याचे पानापानातून जाणवते. प्रत्यक्षानुभूतींमुळेच लेखनाला साहित्यिक धार तथा मूल्य प्राप्त झाले आहे. भविष्यकालिन फलद्रूप साहित्यिक वाटचालीसाठी आमच्या अभीज् श्री पब्लिकेशन्सद्वारा हार्दिक शुभेच्छा. प्रा. विजय जोरी (सेनि प्राचार्य लोणावळा) लेखक... मर्मबंधातली ठेव आक्का, तस्मैश्री... तांबे बाई.
Tanaji Dharane
28/07/2023

'हेलपाटा' ही वंचीतांच्या संघर्षशील जीवनाचं वास्तव अधोरेखीत करणारी कादंबरी !"               ‌................अरुण ह. विघ्ने -----------------------------------------                 'हेलपाटा' ही तानाजी बबन धरणे मु.आंबळे,त.शिरूर,जि.पुणे यांची वास्तव जीवनावर आधारीत ग्रामीण कादंबरी. लेखक ग्रामविकास अधिकारी म्हणून पं.स.रोहा,रायगड येथे कार्यरत आहेत. ते गीतकार, कवी,लेखक आहेत. त्यांची अनेक गीते यु ट्यूबवर आहेत. 'शेताच्या बांधावर', 'सांजवेळ', 'सवप्नचित्र' हे तीन कवितासंग्रह प्रकाशीत असून 'चांदणं पेरीत जाऊ' हा प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ते अनेक पुरस्काराने सन्मानीत आहेत . 'हेलपाटा' ही कादंबरी तसे स्वकथन आहे.ती पी.आर.ग्रुप आॅफ पब्लिकेशन,वरुड जि.अमरावती यांनी प्रकाशीत केली असून प्रस्तावना दत्तात्रय पांडुरंग मानुगडे यांनी लिहीली असून , पाठराखण बाबाराव मडावी,आकांतकार, यवतमाळ  यांनी केली आहे. सदर कादंबरी तळागाळातील असंख्य विद्यार्थी मित्रांना व पालकांना समर्पीत केली आहे. काही प्रतिक्रियांचाही यात समावेश केलेला आहे.         ग्रामीण भागातील मागील पिढीतील बहुतांश विद्यार्थ्यांच्या वाट्याला संघर्षच आलेला आहे. त्यांनी शून्यातून आपलं विश्व उभं केलं आहे. आतासारखी सर्व सुख सोई, अद्यावत साधने त्याकाळी अस्तीत्वात नव्हती. आई-वडील अशिक्षीत, दारिद्र्य पाचवीला पुजलेलं, पावलोपावली जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष. आज तेवढी बिकट परिस्थिती नाही. सर्व सोईसवलती, साधने, उपलब्ध आहेत. बालपणापासून मोबाईल,टी.व्ही.,वाहणे, पैसा,पुस्तके ,चैनीच्या वस्तू सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे सद्याच्या मुला/मुलींना जगण्यातला जीवघेणा संघर्ष फारसा वाट्याला येत नाही. अपवाद असू शकेल. पण चार-पाच दशकापूर्वी मात्र जगण्यासाठी भाकरी आणि भाकरीसाठी कष्ट,उपासमार,हेळसांड,कोसो दूर करावी भटकंती, अपमान सहन करीत या गावातून त्या गावात भटकंती करावी लागायची. त्याकाळी वंचितांसाठीचे शिक्षणाचे वारे जेमतेम वाहू लागले होते. गावातील लोक जास्त शिकलेले नसायचे. त्यामुळे मार्गदर्शन अभाव होता. शिक्षण घ्यायचे ठरविले तरी जगण्यासाठी कुटुंबाचा खर्च आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवितांना पालकांना कसरत करावी लागायची. मोजक्या पैशात कसेतरी दिवस काढावे लागायचे. पोटाला चिमटा घेऊन, प्रसंगी उपाशी राहून,रोजमजूरी करून विद्यार्थ्यांना स्वत:चे शिक्षण पूर्ण करावे लागायचे. शिक्षणासाठी शहरात वस्तीगृहात राहून किंवा रुम करून किंवा नातेवाईकांकडे राहावे लागायचे. त्यामुळे अवास्तव खर्चाला वाव नव्हता. गावातील कुणीतरी एखादा नोकरीत असला की त्याच्या सहा-याने,मार्गदर्शनातून जीवनाचा गाडा पुढे रेटायचा. असं हे जीवन होतं. ब-याच गोष्टीसाठी कार्यालयाचे,महाविद्यालयाचे,नोकरीसाठी मुलाखतीसाठी 'हेलपाटे' खावे/घ्यावे लागायचे. एकूण अशीच परिस्थिती लेखकाच्याही जीवनात होती. लेखकाच्या घरी शेत नाही. खाणारे सात-आठ जीव.एका गावात कधीच काम मिळत नसल्याने वडील जेथे मिळेल तेथे साल धराचे. जेथे साल धरलं, तेच त्यांचं गाव असायचं. पुढील वर्षी दुस-या गावात पायी वारी करावी लागायची. परिस्थितीमुळे लेखकाचे वडील हुशार असूनही सातवीपर्यंतही शाळा शिकू शकले नाही. याची खंत लेखक व कुटुंबाला सतत वाटत राहायची. लेखकाचे वडील सातवी पास झाले असते तर ते कोणत्या तरी नोकरीत असते. जगण्यासाठी असा संघर्ष,पायपीट कुटुंबाच्या वाट्याला आली नसती, असे लेखक नमूद करतात. त्या काळात सामाजीक,आर्थीक विषमता होती. लेखक चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊनही चांगल्या शिक्षणासाठी परिस्थितीमुळे प्रवेश घेऊ शकत नाही. मग कमी पैशात ,कमी शिक्षणात लवकर नोकरी लागेल असे शिक्षण घ्यावे लागायचे. दहावी झाल्यावर डी.एड्. व्हायचे असे लेखक ठरवितो. पण दहाविचा निकाल लागताच शासनाचं शैक्षणिक धोरण बदलतं आणि डी.एड्. आता बाराविच्या पात्रतेवर केल्या गेलं. मग लेखक डी.एड्.चा मार्ग सोडून कृषी पदविकेसाठी प्रवेश अर्ज दाखल करतो. पण अकराविचे वर्ग सुरू होऊनही कृषी पदविका अभ्यासक्रमाची निवड यादी लागत नाही. त्यामुळे त्याची चिंता वाढते. तो शहरातील त्या महाविद्यालयात लीस्ट बघण्याकरीता बरेच 'हेलपाटे' मारतो. पण काही दिवसांनी यादी लागते आणि प्रथम क्रमांकावरच त्याचे नाव असते. त्यामुळे त्याला आनंद होतो. लोक विचारतात हुशार असून पाॅली, इंजीनीअरींगला का गेला नाही? तेव्हा तो सांगतो की, माझी आर्थीक परिस्थिती बरी नसल्याने मला तेथे प्रवेश घेता येत नाही.           लेखक कृषी पदविकेचे दोन वर्षे हलाखीच्या परिस्थितीत पूर्ण करतो. नंतर नोकरीसाठी प्रयत्न करतो. त्यावेळी जिल्हा निवड मंडळ असायचे. तो ग्रामसेवक या नोकरीसाठी आपली निवड व्हावी म्हणून ब-याच लोकांकडे 'हेलपाटे' मारतो. पण त्याचं कुणीही ऐकूण घेत नाही. तो स्वत: लेखी,तोंडी परीक्षा देतो. आणि एक दिवस त्याचे सर्व प्रयत्न फळास येतात. त्याला निवडीचं काॅल लेटर पोष्टाने घरी येतं. त्याला व कुटुंबाला अत्यानंद होतो. त्याच्या भाऊ (वडील), बाई (आई), अण्णा(मोठा भाऊ),वहिणी, बहिणी या सर्वांचे स्वप्न लेखकाने पूर्ण केले असते. समाजात वडीलांचा व कुटुंबाचा मान सन्मान वाढतो. एरव्ही समाजातील लोक त्यांना मुद्दाम डिवचायचे,लागली का नोकरी म्हणून ?            मानवी जीवनात निश्चितच  चढ-उतार, खाच-खडगे, वळणं येत असतात. पण आयुष्यात जर प्रयत्न,चिकाटी ,आत्मविश्वास असेल तर त्या परिस्थितीवर वर मात करीत आपले ध्येय गाठता येते. हेच या कादंबरीच्या लेखकाला आजच्या पिढीला सांगायचे असावे. असे वाटते. ही कादंबरी शोषीत,वंचीत,भटके,पिडीत,गरीब या लोकांची जीवनपद्धती व जीवनसंघर्ष अधोरेखीत करते. आजची परिस्थितीही नोकरीसाठी सोपी नाही.विविध शासकीय विभागांचे/आस्थापनांचे खाजगीकरण झाले आहे. शासकीय नोकर भरती बंद आहे . खरडेघासी बंद होऊन सर्व कामे संगणकावर होत असल्याने तेवढ्या माणसांची गरज भासत नाही. त्यामुळे नोकरी कुणा कुणाला मिळणार? चिकार पैसा खर्च करून आजच्या पिढीने उच्च शिक्षण घेतले आहे पण नोक-या नाही. कोटी युवक-युवती बेरोजगार आहेत. त्यामुळे त्यावेळची शिक
Ravindra Tejrao Thorat
27/07/2023

ग्रामीण भागातील संघर्ष लेखकाने जिवंतपणे मांडला आहे ,वाचनीय व प्रेरणादायी अशी कादंबरी आहे ,सर्वांनी वाचायला हवी ,लेखक श्री तानाजी धरणे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा!
Yash Dharane
27/07/2023

मी नुकतेच "हेलपाटा" वाचून पूर्ण केले आणि मला म्हणायचे आहे, तुमचे लिखाण अगदी मनमोहक आहे! तुमच्या आत्मचरित्राने मला तुमच्या आयुष्यातील एका सखोल प्रवासात नेले आणि मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत खऱ्या अर्थाने मग्न होतो. तुमचे अनुभव आणि भावना व्यक्त करण्याची तुमची क्षमता प्रशंसनीय आहे, ज्यामुळे वाचकाला सहानुभूती दाखवणे आणि तुमच्या कथेशी जोडणे सोपे होते. तुम्ही ज्या प्रकारे तुमच्या जीवनातील घटनांचे वर्णन करता ते आश्चर्यकारकपणे आकर्षक आहे आणि तुमचे वर्णनात्मक पराक्रम प्रत्येक क्षणाला जिवंत करते. तुमची भाषा आणि लेखनशैलीची निवड एक अखंड प्रवाह निर्माण करते ज्यामुळे वाचक उत्सुकतेने पृष्ठे फिरवत राहतात, तुमच्या उल्लेखनीय प्रवासाबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छितात. शेवटी, मला "हेलपाटा" साठी माझे अत्यंत कौतुक व्यक्त करायचे आहे. तुमच्या लेखनात वाचकांच्या हृदयाला स्पर्श करण्याची आणि त्यांना आत्मपरीक्षणाची प्रगल्भ जाणीव ठेवण्याची अनोखी शक्ती आहे. तुमचे आत्मचरित्र हे खरे रत्न आहे आणि ते वाचण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. तुमची कथा जगासोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद. मला यात शंका नाही की "हेलपाटा" अनेकांना प्रतिध्वनित करेल आणि जो कोणी वाचेल त्याच्यावर कायमचा प्रभाव टाकेल. अशा प्रतिभावान लेखकाच्या भविष्यातील कोणत्याही कामाची मी आतुरतेने वाट पाहतो.
श्री विष्णू संकपाळ
27/07/2023

मनाला भावलेली उत्कृष्ठ साहित्य कृती म्हणजे हेलपाटा. जीवनातील यशस्वीतेचे स्वप्न साकार करण्यासाठी लेखकाने केलेला संघर्ष,हा संघर्ष होता घासभर अन्नाचा, हा संघर्ष होता शिक्षण घेऊन मोठं होण्याचा, हा संघर्ष होता आई, वडील आणि मोठ्या भावाचे पांग फेडण्याचा. आजच्या तरुण पिढीच्या आचार विचारला दिशा देणारा संघर्ष रुपी हेलापाटा कादंबरी प्रत्येकाने वाचली पाहिजे. विशेषतः नव युवकांनी जरूर वाचली पाहिजे . लेखक तानाजी धरणे यांचे हार्दिक अभिनंदन व आगामी साहित्य रचणे साठी हार्दिक शुभेच्छा.
Nilam Shinde
26/07/2023

❤️ हेलपाटा पुस्तकातील भावना प्रधान वर्णन , भाषा त्याच प्रमाणे नात्यातील नाजून रेघ सुंदर जपल्यामुळे हे पुस्तक आपोआपच तो काल नजरेसमोर घेऊन जाऊन,त्या परिस्थीत मनाला जाणीव करून देत आहे . आपल्या आयुष्यातील पैसा , प्रतिष्ठा, मान, आपमान,प्रेम, द्वेष या साऱ्याच काही प्रमाणात किती फोल गोष्टी आहेत. मानसिक शांती, सर्वात जवळच्या माणसाचा विश्वास & आपुलकी या वर किती गोष्टी आवलबून असतात हे समजते . जीवनात महत्व कशाचे आहे हाच या कादंबरीचा गाभा आहे असे मला वाटते.मला हे पुस्तक खूप आवडेल आहे.काही ठिकाणी तर डोळ्यातून चटकन पाणी घेऊन जात ....... 👌👌👌👌👌
मंगेश गंगाधर सावंत
26/07/2023

*"तानाजी धरणे सर यांच्या "हेलपाटा" कादंबरीचे वर्णन"* मित्रांनो "हेलपाटा" ही कादंबरी ग्रामसेवक तानाजी धरणे सरांनी लिहिले आहे. ही कादंबरी हृदयस्पर्शी संघर्षमय कादंबरी आहे. या कादंबरीमध्ये लहानपणी घडलेला प्रसंग, अनुभव या कादंबरीत सांगितलेला आहे. "हेलपाटा" ही कादंबरी वाचताना प्रत्यक्षात चित्रच डोळ्यासमोर येऊन उभ राहतं,आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, असे या कादंबरीत लिखाण केले आहे. आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी केलेली कसरत या कादंबरीत सांगितलेली आहे. ही कादंबरी वाचताना यातून आपल्याला काहीतरी बोध मिळतो, काहीतरी घेण्यासारखे आहे. मी कादंबरी वाचत असताना काही अनुभव आले, माझाही भूतकाळ मला आठवू लागला. खरंच पूर्वीची माणस खूप ग्रेट होती. त्यांचे राहणीमान, चालीरीती, त्यांची घरं, त्यांचे आचार विचार, त्यांची बोलणी असे अनेक माणसांचे गुण आपल्या मनाला भुरळ घालताना दिसतात. आज आपल्याला एखादा म्हातारा माणूस भेटला ना त्याची बोलण्याची भाषाच वेगळी बाळा, राजा, वाघा, साहेब, असे अनेक शब्द लावून आपल्याला आवजाव बोलतात, त्यांच्या बोलण्यात गोडवा दिसतो. हे मी अनुभवल आहे. पूर्वीची माणसे खूप साधेपणाने राहत होते. त्यांच्या जेवनाचा बेत खूप मनाला लागणार होता. पूर्वी माणसे चुलीवर भाकर, बेसन आणि हिरव्या मिरचीचा रगडा करून खात असे आणि आत्ताची माणसे परिपकवान खाताना दिसतात. पूर्वीच्या माणसांना परिपकवान खाण्याची सवय नसते.माणसाने जीवनात कोणत्या गोष्टी अनुभवाव्या व संघर्ष कोणत्या गोष्टीचा करावा यात आपल्याला अनुभवायला मिळतो. आपण जीवन जगत असताना खूप संकटे, दुःख येतात. त्या संकटांवर मात करावी, आपल्याला संघर्ष करावा लागतो. संघर्ष केल्याशिवाय सुखाचे दिवस येणार नाही,म्हणून आपण जीवनात नेहमी संघर्ष केला पाहिजे, कारण प्रत्येकाच्या जीवनात संघर्षाला खूप महत्त्व आहे. संघर्ष केल्याने माणूस घडतो आणि माणूस घडला की मग समाज घडतो ज्याने दुःखच पाहिले नाही त्याला सुखाची किंमत काय कळणार, सुख म्हणजे काय हे काय कळणार. माणसाने संघर्ष केलाच नाही, तर खरे जीवन कसे कळणार म्हणून माणसाला खरे वळण द्यायचे असेल, तर जीवनात संघर्ष हा हवाच. आपल्याला आलेले दुःख पचवण्याची सवय झाली पाहिजे.खरंच दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसणार नाही अशी म्हण उमगली पाहिजे. आपण जीवन जगताना येणाऱ्या आयुष्यात विनातक्रार भोगत राहायचं नाही, नशिबाला दोष द्यायचा नाही, शेवटच्या श्वासापर्यंत जगत राहायचं. जीवनात किती संकटे आले तरी मागे हटायचं नाही. एक ना एक दिवस आपला विजय नक्कीच होणार, असे यात सांगितले आहे. या कादंबरीमध्ये धरणे सरांनी सांगितल आहे, जगणं काय असतं, संकटे कशी असतात, प्रत्येकांवर प्रसंग कसा येतो याचे वर्णन केवळ शब्दात करणं कठीण आहे. प्रत्येक बाप कुटुंबासाठी एवढा खस्ता खात असतो, की पोरांना आपल्या चांमड्याचे जोडे करून बापाला घालायला दिले तरी बापाचे ऋण फिटणार नाही असे यात सांगितलेले आहे. ही कादंबरी मी पूर्ण वाचली खूप अप्रतिम लिखाण केलं आहे. प्रत्येकाने ही कादंबरी वाचली तर सर्वांचाच अनुभव जागा होतो, आणि प्रत्येक व्यक्तीने जीवन कस जगावं हे यात सांगितल आहे. आपण हुशार असतो पण आपल्या घरची परिस्थिती हलाकीची असल्याने आपण शिक्षण घेऊ शकत नाही असं म्हणण्यापेक्षा आपल्यात शिकण्याची जिद्द असली पाहिजे हे यात दाखवलं आहे. प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी आहे ही कादंबरी "हेलपाटा" मंगेश गंगाधर सावंत  (कवी.लेखक) समाज मंदिर भीम नगर मु. पोस्ट. पुस .ता :-अंबाजोगाई  जिल्हा :- बीड  पिनकोड :- 431519 मो.नं :- 9527046634, 9356557485
Suniti Polekar
26/07/2023

khup chan kandbari👌👌
Rupali vaman khamkar
26/07/2023

हेलपाटा कांदबरी खूप छान आहे....👌👌
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat