Home
>
Books
>
नाटक
>
Nyayalay Ani Marathi Natak - न्यायालय आणि मराठी नाटक
न्यायालय आणि मराठी नाटक
9789387628380Dr. Madhura KoranneDramaNatakNyayalay Ani Marathi NatakSnehavardhan Prakashanडॉ. मधुरा कोरान्नेन्यायालय आणि मराठी नाटकनाटकस्नेहवर्धन प्रकाशन
Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
न्यायालय हा लोकशाहीचा कणा आहे तर नाटक हा साहित्यप्रकार वास्तवाशी अधिक जवळीक साधणारा आणि मानवी जीवनधारेशी निगडीत आहे. नाटक हे हृदयाचा ठाव घेणारे आहे तर न्यायालय हे जीवन आश्वासक करणारे आहे. हे ओळखून डॉ. मधुरा कोरान्ने यांनी 'न्यायालय आणि मराठी नाटक' या अनोख्या विषयाची केलेली निवड, त्यासाठी घेतलेल्या परिश्रमाला अभ्यासाची जोड देऊन लिहिलेले हे अनोखे पुस्तक मराठी सारस्वतात एकमेवच आहे हे लक्षात येते. अनेक साहित्य प्रकारात लेखन करणारे जसे साहित्यिक आहेत तसे एका साहित्यप्रकाराला वाहून घेणारेही लेखक आहेत. डॉ. कोरान्ने यांची बालवयापासूनच असलेली नाटकाची आवड लक्षात घेता त्यांनी आयुष्यभर नाट्यप्रकाराशी एकनिष्ठ राहून नाट्यक्षेत्राशी संबंधित अशी दहा पुस्तके लिहिली इतकेच नव्हे तर त्यांच्या पीएच. डी. चा विषयही नाटकच आहे. या एकनिष्ठेची जपणूक करताना नाविन्यपूर्ण विषयही त्यांनी हाताळले आणि हे पुस्तक त्याचेच एक फलित आहे. मराठी स्वातंत्र्योत्तर काळातील तब्बल पंचवीस नाटकांचा आणि न्यायालयाचा कसा संबंध आहे, न्याय-अन्यायाच्या वास्तवदर्शी कल्पना नाटक या साहित्यप्रकारात कशाप्रकारे हाताळल्या आहेत यांचे एक आगळेवेगळे विवेचन ओघवत्या भाषेत या ग्रंथाच्या रूपाने मराठी रसिक वाचकांना लाभलेले आहे. नाट्यक्षेत्रातील विविध विषयांवर लेखन करणाऱ्या डॉ. मधुरा कोरान्ने यांचे मन:पूर्वक अभिनंदन. त्यांच्या नाट्यप्रेमाला शुभेच्छा आणि आता 'यांत्रिकीकरण आणि मराठी नाटक' या विषयावर त्यांनी पुस्तक लिहावे असे सुचवून डॉ. मधुरा कोरान्ने यांच्या नाट्यप्रेमाला त्रिवार वंदन करते.