तत्त्वमसि
Anjanee Naravane Anjanee Narawane Anjani Naravane Anjani Narawane Anuvadit Dhruv Bhat Fiction Kadambari Marathi Fiction Marathi Novel Mehata Publishing House Mehta Publishing House Novel Tattvamasi Tatvamasi Translated Translation अंजनी नरवणे अनुवादित कथा कादंबरी तत्त्वमसि तत्वमसि ध्रुव भट मेहता पब्लिशिंग हाऊस
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 240 R 180 / $ 2.70
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
"नद्यांमध्ये नर्मदा मला सर्वाधिक प्रिय आहे. ही कथा ज्या गोष्टींवर आधारीत आहे त्यात परिक्रमावासी, नर्मदातीरी राहणार्‍या किंवा पूर्वी कधी राहिलेल्या व्यक्ती, नर्मदाकाठच्या मंदिरांमधील आणि आश्रमांतील रहिवासी या सर्वांकडून ऐकलेल्या गोष्टी, माझ्या नर्मदाकाठच्या भ्रमंतीमध्ये मला समजलेल्या हकीकती आणि थोड्या माझ्या कल्पना यांचा समावेश आहे." असे ह्या कादंबरीच्या लेखकानेच सांगून ठेवले आहे. गुजराती लेखक ध्रुव भट ह्यांचा हा कादंबरी नायक अठरा वर्षांनी भारतात परततो ते अंधश्रद्धा आणि धर्मांधता यांनी ग्रासलेल्या प्रजेला योग्य दिशा दाखवण्याच्या उद्देशाने, प्रजेतील सुप्त शक्ती शोधून त्याचा समाजाला लाभ मिळवून देण्याचय प्रयत्नात आदिवासी प्रदेशात त्याला अनेक लोक भेटतात. या लोकांच्या संस्कृती, परंपरा इत्यादींचा परिचय करून घेत असताना त्याला अनेक प्रश्न पिंगा घालू लागतात. त्याचे प्रगत ज्ञान आणि ह्या तथाकथित अशिक्षितांचे ज्ञान ह्यांची 'टक्कर ’ सुरू होते - तीच ह्या कादंबरीची 'ठिणगी’ आहे.
Book Review
Write a review

Nikhil Bandal
14 Jun 2025 11 12 AM

आयुष्यातील १८ वर्षे परदेशात घालवल्यानंतर अचानक पणे आदिवासींमध्ये राहून त्यांच्या विकासासाठी काम करायची कामगिरी मिळाल्यानंतर जी काही मनाची संभ्रमावस्था होईल तेथुन या कथेची सुरवात होते. व यानंतर संपुर्ण कथेमध्ये एक द्वंद्व दिसुन येते ते असते शहरी संस्कारात वाढलेल्या एका बुद्धीनिष्ठ व्यक्तीमध्ये व निसर्गाशी पुर्णपणे एकरूप झालेल्या आदिवासींन मध्ये, त्यांच्या परंपरांना मध्ये व त्यांच्या विचारसरणी मध्ये. मुख्य पात्रास येथे अनेक प्रश्न पडत असतात जसे की एका नदीला देवत्व कसे बहाल केले जाते, लोक इतके कष्ट घेवुन नर्मदा परिक्रमा का करतात, त्यांना अशी काय अनुभुती मिळत असेल, वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरा अजुनही लोक का पाळत आहेत. या परंपरांना मागे काही विचार आहेत का.... ? व असे बरेच प्रश्न... या पुस्तकाचे सर्वात मुख्य वैशिष्ठ्य म्हणजे यातील जे मुख्य पात्र आहे त्याचे नाव आपल्याला शेवटपर्यंत समजत नाही व संपुर्ण कथेमध्ये प्रथमपुरुषी उल्लेखामुळे आपणच त्या कथेचा भाग आहे असे वाटत रहाते व दुसऱ्या अर्थाने पहायचे झाल्यास आपली विचारसरणीपण कमी अधिक प्रमाणात कथेतील मुख्य पात्रासारखीच असते त्यामुळे पण हे पुस्तक वाचनिय होते. आदिवासींच्या विविध परंपरा, त्यांची विचारसरणी, निसर्गाप्रती त्यांचे असणारे प्रेम, आदरभाव, पुर्वापार चालत आलेल्या परंपरा जपण्याचा त्यांचा अट्टाहास, त्यांचे दैनंदिन जीवन व रोजचे जीवन जगताना येणाऱ्या समस्या या सर्वांच्या निरीक्षणातून व निसर्गातून मिळणाऱ्या विविध अनुभवातुन कथेतील मुख्य पात्रास विविध गोष्टींचे आकलन होत जाते व एका वेगळ्या दिशेने त्याचा प्रवास सुरू होतो. व यातुन वाचकाला पण भारतीय संस्कृती, त्यातील परंपरा, त्यामागील विचार अशा विविध गोष्टींची उकल होत जाते. तत्वमसी भारतीय संस्कृतीचा एक वेगळा पैलू दाखवून जाते
Vaibhav Joshi
14 Apr 2023 09 19 AM

अतिशय उत्तम साहित्य.. दर्जेदार
Ashish
10 May 2014 03 27 PM

One of the best books I read.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat