Summary of the Book
एका महान सद्गुरुंद्वारे चिरंतन प्रश्नांची उत्तरे
मी वस्तुतः कोण आहे?
मी माझे मन कसे स्थिर करू?
ध्यान म्हणजे काय?
इतकी आहेक संसारिक उत्तरदायित्वे असताना मी एक आध्यात्मिक जीवन कसे जगू?
मी एका खऱ्या गुरूंना कसे ओळखू?
परमार्थ कथाप्रसंग, हे आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त आध्यात्मिक सद्गुरू बाबा मुक्तानंद यांच्या सोबत झालेल्या सत्संगातील संवादाचे संकलन आहे. हे सत्संग- संवाद बाबा मुक्तानंदांद्वारे शिकवणी प्रदान करण्याच्या त्यांच्या अभियानातील आरंभीच्या वर्षामध्ये झाले होते. या पुस्तकात बाबा प्रत्येक व्यवसायाच्या व तत्वज्ञानविषयक मतांच्या लोकांना समानतेने संबोधित करतात, मग ते राजनेते असोत किंवा विद्यार्थी, व्यावसायिक असोत किंवा संन्यासी, नास्तिक असोत किंवा संत.
सिद्धगुरू स्वामी मुक्तानंद यांनी आपल्या परंपरेची आध्यात्मिक दीक्षा आणि तिच्या चिरंतन अभ्यासांचा अमूल्य उपहार ना केवळ आपली प्रिय मातृभूमी भारताच्या, परंतु विश्वभरातील लोकांनादेखील प्रदान केला.