Summary of the Book
शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी काय करावे, हे आपल्याला माहित असते; पण उत्साही, प्रसन्न, प्रफुल्लीत कसे ठेवायचे याची पुरेशी माहिती नसते. काय केल्याने प्रत्येकजण आनंदी राहू शकेल हे सांगण्याचा प्रयत्न डॉ. चंद्रशेखर देसाई यांनी 'आनंदमार्ग 'मधून केला आहे.
जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गोष्टींची पूर्तता झाली की मन संतुष्ट होते; पण सध्या जागतिकीकरणाच्या फेऱ्यात अडकलेला माणूस यापलीकडे जाऊन सुख शोधत असतो.
जास्त पैसा, बंगला, गाडी, ऐशोआरामाच्या वस्तू याभोवती त्याचा आनंद फिरत असतो. मात्र प्रत्येकाचा आनंद वेगवेगळ्या गोष्टींत असू शकतो. याचे कारण जनुकीय रचना व माणूस यांचा संबंध हे होय.
हवा, अन्न, पाणी, काम, व्यायाम, आराम, वेळच्या वेळी मलमूत्र विसर्जन या माफक गरजा भागल्या कि शरीर काहीही कार्य तयार होते; तसेच सुरक्षितता, उद्याच्या जेवणाची शाश्वती, कुटुंबाचे सुख, नातेवाईक, मित्र - मैत्रिणी या गरजाही पूर्ण झाल्या तर सुखी माणसाचा सदरा माणूस घालू शकतो; पण तरीही माणूस सुखी का नसतो, हे सांगत त्यावरील उपाय यात सांगितले आहेत. जेणेकरून प्रत्येकाला आनंदमार्ग सापडेल.