Summary of the Book
मराठी माध्यमातील शालेय विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी विषयाची भीती असते. दहावीच्या परीक्षेत याचे प्रतिबिंब परीक्षेत पडते. पण इंग्रजीचा बागुलबुवा न करता वर्षभर नियमित अभ्यास केला तर या विषयातही उत्तम गुण मिळणे सहजशक्य आहेत.
इंग्रजीचा अभ्यास कसा करावा व प्रश्नपत्रिका कशी सोडवावी, याचे मार्गदर्शन 'दहावी इग्रजी पास हमखास ' यातून केले आहे. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप लक्षात घेऊन ती सोडविण्याचा सराव व प्रयत्न करावेत. यासाठी प्रश्नपत्रिका कशी असते, त्यातील प्रश्नांचे स्वरूप यात समजावून दिले आहे.
सीन - अनसीन पॅसेज, पोएट्री, रॅपिड रीडिंग, लेटर रायटिंग, नॅरेटिंग, ऑर डिस्क्रायबिंग, रिपोर्ट अँड डायलॉग रायटिंग, इन्फर्मेशन ट्रान्स्फर, ट्रान्सलेशन यावर आधारित प्रश्न कसे सोडवतात हे सांगून नमुना प्रश्न, त्याची उत्तरे, सरावासाठी प्रश्न तसेच मार्च २०१५ ची प्रश्नपत्रिका व त्याची आदर्श उत्तरपत्रिका यात दिले आहेत.
विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या संभाव्य चुकांच्या स्पष्टीकरणासह उत्तरे यात असल्याने चुका सुधारण्यास मदत होईल. इंग्रजीत पैकीच्या पैकी यश मिळवण्यासाठी काय करावे व करू नये हे यातून सांगितले आहे.