Omkar
01 Oct 2018 05 30 AM
दोन दिवसांपासून चित्र ज्ञानेश्वरी हे पुस्तक वाचतो आहे अनुभवतो आहे. हा कर्मयोगाचा प्रवास चित्रां मधून सुंदर रेखाटला आहे. ज्ञानेश्वरीतील ओवीचा आधुनिक जगण्याच्या शैलीशी घातलेला मेळ हि खूप बोलका आहे आणि चित्रातूनच ओवीचं दर्शन देणारा आहे. माझ्या सारख्या मूढ वाचकाला ज्ञानेश्वरी ची नव्याने ओळख झाली आणि हो ओढ हि लागली ,माझ्या भावना व्यक्त करायला माझे शब्द अपुरे आहेत
Thank you so much Deepali Patwadkar
चित्र ज्ञानेश्वरीची गाथा,वर्णाया पडे शब्द तोकडा
ज्ञानोबाच्या ओवीचा तो तर चित्र रुपी दिव्य सोहळा
कागदावरी चार रेघा बसवल्या जसा मेळ अनोखा
कर्म योग तो भावार्थ दीपिकेचा चित्रा तुनी बोलता झाला
हा प्रवास आणखी अनुभवायला मिळेल हि अशा करतो
prasad
01 Oct 2018 05 30 AM
तरुण भारत मधुन प्रसाद फाटक यांनी लिहिलेला पुस्तक परिचय - " ... चांदण्या रात्री तलाव जसा मुठीमुठी चांदीचे रुपये उधळल्यासारखा चमचमावा तसं हे पुस्तक म्हणजे रेषांची आणि बिंदूंची उधळण आहे. या पुस्तकात एकेक ओवी दोन प्रवाहात कागदावर ओघळली आहे, एक अक्षरांचा आणि एक रेषांचा. एकाच ओवीचे उजव्या पानावरचे शब्दबिंब (English आणि मराठीत) आणि डाव्या पानावर त्याचे चित्रप्रतिबिंब अशी पुस्तकाची मांडणी ओवीचा तिहेरी आनंद देऊन जाते ...
विभावरी
01 Oct 2018 05 30 AM
हे मजचिस्तव जाहले, परी म्या नाही केले|
ऐसे जेणे जाणितले, तो सुटला गा ||
ह्या ओवीबद्दल लिहिले आहे -
‘ सूर जरी बासरीतून निघाले तरी त्या स्वर्गीय स्वरांचा कर्ता मुरलीधर आहे. बासरी जर वृथा आपले कर्तेपण मिरवू लागली तर हे हास्यास्पद नव्हे काय?’
ह्या ओवीसाठी काढलेलं मुरलीधराचं चित्रं आणि त्या चित्रातून बाहेर येऊन व्यापून राहिलेले चित्रित स्वर्गीय सूर ह्याने हे चित्र, ओवी, थोडक्यात लिहिलेला अर्थ हे असे एकमेकात मिसळून एक वेगळीच अनुभूती देतात.
चित्र ज्ञानेश्वरी भाग १ आणि २ ही दोन्ही पुस्तकं आवर्जून वाचावीत, बघावीत आणि अनुभूती घ्यावी अशी आहेत.
Supriya Kishore
01 Oct 2018 05 30 AM
भगवद्गीता किंवा महाभारत हे माझे नेहमीचे आवडीचे विषय आहेत.
'ज्ञानेश्वरी'.. इथे लेखिकेच्या नजरेतून.. सुरु होते एका 'बिंदू' पासून... आरंभही तोच .. अंतही तोच ..
एकेक बिंदू जोडून, रेषा जोडत लेखिका आपल्यासमोर ज्ञानेश्वरी उभी करत जाते.. प्रत्येक illustration मागे घेतलेली मेहनत आणि patience वाखाणण्याजोगा आहे 👌
एक वेगळाच concept, या आधी कधी विचार केला नव्हता. आणि तिच्या हातून घडलेल्या या कार्याचं श्रेय ती ज्ञानोबांना देतेय :)
कधीही कोणतंही पान उघडा, वाचा, चिंतन करा, कामाला लागा, काम करताना मनन करा. लेखिकेची बिंदुरूपी ज्ञानेश्वरी डोळ्यांसमोर फिरत राहते.
पुस्तकात प्रा. राम शेवळकरांच्या वाक्याचा उल्लेख आहे -
"ज्या वयात ज्ञानेश्वरी लिहिली गेली, त्या वयातच वाचली पाहिजे"
लेखिकेने अजून ज्ञानेश्वरी च्या काही भागांवर काम करावे हि विनंती, तिच्याद्वारे पूर्ण भावार्थदीपिकेशी जोडलं जायला खूप आवडेल :)
पुस्तकातील लिखाण मराठी आणि English दोन्ही भाषेत आहे.
दोन्ही पुस्तके सर्वांनी आवर्जून वाचा आणि इतरांना भेट म्हणूनही द्या.
Deven
10 Jun 2017 05 30 AM
Very nice introduction to Dnyaneshwari and innovative way to present the subject.