Hard Copy Price:
25% OFF R 199R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 199R
149
/ $
1.91
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
काही काळापासून, राजकीय दबावांमुळे वामपंथी आणि तसेच तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांनी आरएसएसच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेविषयी दुष्प्रेरित प्रचार केला आहे आणि त्यांची सामाजिक सेवांचा उत्तुंग विक्रम मलिन केला आहे.
हे पुस्तक आपल्याला सांगते की संघ त्याच्या स्थापनेपासूनच स्वराज्याच्या कारणासाठी समर्पित होता. डॉ. हेडगेवार यांचे जीवन आणि कार्य आणि स्वयंसेवकांनी घेतलेली शपथ स्वातंत्र्य संघर्षाची वचनबद्धता स्पष्टपणे दर्शवते. या स्वातंत्र्याला स्वराज्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी, भारताला समर्पित, शिस्तबद्ध आणि शूर ध्येयवादी युवा पुरुषांची आवश्यकता होती. ब्रिटीश नोंदी स्पष्टपणे दाखवतात की ते स्वातंत्र्य संघर्षासाठी आरएसएसचा वाढता प्रभाव पाहून चिंतेत होते.
१५ ऑगस्ट, १९४७ रोजी ‘नियतीशी करार’ यासह स्वातंत्र्य चळवळ संपली नाही. या संध्याकाळी अनेक अंधारलेल्या रात्री होत्या, जेव्हा सुरक्षा दलाव्यतिरिक्त आरएसएस कार्यकर्ते सर्वात मोठे संघटित दल होते ज्यांनी लाखो लोकांचे नष्ट झालेले जीवन वाचवण्यासाठी आपले जीवन धोक्यात घातले. ही वीरगाथा देशभक्तीची होती की सांप्रदायिक होती हे भारताच्या लोकांना आणि इतिहासाला ठरवायचे आहे. लेखक स्वातंत्र्याकडे नेणाऱ्या इतर घटकांवर प्रकाश टाकतात आणि हे कोणत्याही एका आंदोलन किंवा कृतीचे परिणाम नव्हते तर सांस्कृतिक पुनरुज्जीवनाच्या लाटेवर हळूहळू उभे राहिले होते जे भारतातील महान अध्यात्मिक नेत्यांनी सुरू केले होते.
डॉ.रतन शारदा यांना पीएचडी ने सन्मानित केले गेले ज्यासाठी त्यांचा शोधप्रबंध होता ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्याच्या प्रस्तावांच्या माध्यमातून समजून घेताना, विशेषत्वाने पूर्वोत्तर राज्ये, पंजाब आणि जम्मू काश्मीर’.
सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई चे माजी विद्यार्थी असलेल्या त्यांनी इंग्रजी आणि हिंदी भाषेतून १० पुस्तके लिहिली आहेत, ज्यातील ७ पुस्तके संघावर आहेत. ज्येष्ठ संघ विचारक रंगा हरीजी यांनी श्रीगुरुजींवर लिहिलेली २ महत्त्वपूर्ण पुस्तके त्यांनी अनुवादित केली आहेत. त्यांनी १६ पुस्तकांचे संपादन/रचना केलेली आहे . त्यांचे पुस्तकत्रय - RSS ३६०, Demystifying Rashtriya Swayamsevak Sangh, RSS - Evolution from an Organisation to a Movement & Conflict Resolution The RSS Way ही संघाच्या प्राथमिक माहितीसाठी सर्वोत्तम समजली जातात.
बालपणापासून संघ स्वयंसेवक असलेल्या त्यांनी संघात शाखास्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत विविध दायित्व भूषवली आहेत. ते प्रख्यात टीव्ही पॅनेलिस्ट (चर्चक) आणि सार्वजनिक व्याख्याते/वक्ता आहेत. त्यांनी भारतभर विस्तृत प्रवास आणि २६ देशांना भेटी दिल्या आहेत. ते सार्वजनिक कामे, सेवा आणि विविध समाजसेवी संघटनांचे सल्लागार अशा कामात व्यग्र असतात.