मिश्किली
अक्षयापती अभयानंद कृत
Abhay Angchekar; अभय आंगचेकर Humurous Lalit Mishkilee Mishkili SahityaSampada Prakashan Vinodi अक्षयापती अभयानंद कृत मिश्किली मिश्किली ललित विनोदी साहित्यसंपदा प्रकाशन
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 150 R 112 / $ 1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Book Review
Write a review

Mrs Bhagyashree Amit Kulkarni
22 Jul 2024 03 58 PM

मिश्किली... हे पुस्तक वाचकांसाठी मेजवानी आहे. लेखकाची विनोदबुद्धी अतुलनीय आहे. एक एक विनोद वाचताना आपोआपच चेहेर्यावर एक मिश्किल हास्य उमटते. अशा गमतीशीर पुस्तकासाठी लेखकाचे खुप खुप आभार. असेच छान छान लिहीत जावे. पुढील पुस्तकांसाठी अनेक शुभेच्छा. धन्यवाद... 🙏😊
Suvarna Patil
16 Jul 2024 09 31 PM

हास्य रसाने भरलेली ओंजळ म्हणजे मिश्किल पुस्तक होय. मन उदास असेल तेव्हा पुस्तकाचे कुठलेही पण उघडून वाचले की लगेच ताजेतवाने व्हावे असे पुस्तक. खूप छान
Sangeeta Nalawde
16 Jul 2024 06 37 PM

एखाद्या भर दुपारी रणरणत्या उन्हातून चालताना , हवेची एखादी झुळूक कशी सुखावून जाते , तसे काहीसे मिश्किली बद्दल बोलू शकतो.....घराचा व्याप, प्रवास , ऑफिस राजकारण etc etc etc ताण तणाव विसरायला लावणारे पुस्तक म्हणजे मिषकीली.....बुकमार्क ची गरज नाही की आठवण ठेवण्याची कोणतेही पान उगढा. आणि फक्त हसा.....सहज हसवणारी....फुलावणारी.......काही वेळे पुरते तरी मन प्रसन्न करणारी मिस्कीली खूप खूप आवडली.....खूप शुभेच्छा
Seema Harkare
16 Jul 2024 12 35 PM

|| श्री गजानन महाराज प्रसन्न || पुस्तक समीक्षण पुस्तकाचे नांव --- *मिश्किली* मला शुक्रवारी पुरस्कार आणि सन्मान पत्र मिळाले त्याच पाकिटात आणखी एक वस्तू होती ती म्हणजे मिश्किली संग्रह.तो पाहताच मला खुप खुप आनंद झाला.देता किती घेशील दो कराने अशीच माझी स्थिती झाली होती.आणि हा मिश्किली संग्रह स्वतः लेखकांनी म्हणजे श्री अभय आंगचेकर सरांनी च पाठवला होता. मला तो भेट स्वरुपात मिळाला मी स्वतःला भाग्यवान समजते. आपल्या आजुबाजूला नकळत किती तरी विनोदी किस्से घडत असतात आपण तेंव्हा हसतो आणि विसरून जातो पण ह्याच विनोदी किस्स्यांचे मिश्किली मध्ये रुपांतर करण्याची कल्पना लेखकाला सुचली खरोखर कौतुकास्पद आहे.लेखकाच्या ह्या कल्पने मुळे विनोदी किस्स्यांचा मिश्किली रुपात कायम स्वरूपी ठेवा आपल्या जवळ असणे खुप मोलाचे आहे असे म्हणावेसे वाटते. हा मिश्किली संग्रह अक्षयापती अभयानंद कृत आहे. ह्या संग्रहाचे प्रकाशन साहित्य संपदा प्रकाशनने केले आहे. एका आवृत्तीचाच इतक्या लवकर खप झाला की लागलीच १५ सप्टेंबर २०२३ ला दुसरी आवृत्ती काढावी लागली. मिश्किली संग्रहाचे मुखपृष्ठ पहाताच हसू येते. ह्या मिश्किली संग्रहात बायकांवरही जरी काही मिश्किली असल्या तरी कुठेही छचोरपणा आलेला नाही,अगदी निरागसतेने त्यांनी मिश्किली लिहील्या आहेत.एकेक मिश्किली वाचता वाचता मी एकटीच असून हसत होते ,त्यावेळेला दुसरं कुणी समोर असतं तर ह्या बाईला वेड लागलं की काय अशी शंका त्याला आली असती. सहजच हसणं म्हणजे काय तर मिश्किली संग्रह . इतके प्रभावी हास्य प्रत्येक मिश्किली मध्ये आहे मी तर म्हणेन की एखाद्या व्यक्तिला बेड रेस्ट सांगितली असेल तर त्याच्या उशी जवळ हा संग्रह ठेवावा जेंव्हा त्या व्यक्तीला कंटाळा येईल तेव्हा तो संग्रह पटकन त्याने हातात घ्यावा आणि जे पान उघडल्या जाईल तिथून वाचायला सुरुवात करावी की त्याच्या त्रासलेल्या मुखावर स्मित हास्य येईल ती व्यक्ति नकळत हसेल आणि लवकरच बरी होईल ह्याची खात्री आहे. हास्यमयी मिश्किली संग्रह काढल्याबद्दल लेखक श्री अभय आंगचेकर ह्यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करते आणि पुढील संग्रहासाठी सदिच्छा देते. सीमा हरकरे ©️®️
सलोनी बोरकर
13 Jun 2024 03 15 PM

हे पुस्तक वाचा आणि आजारांपासून आणि डॉक्टरच्या भयंकर बिलांपासून मुक्ती मिळवा. किंमत अगदी वाजवी आहे. साधारण किमतीत असाधारण इलाज.
Dr. Deepak Rasal
12 Jun 2024 04 42 PM

हे पुस्तक म्हणजे मराठी भाषेची जादू दाखवणारे,लोकांच्या वर्मावर बोट ठेवताना त्यातील मार्मिकता सांगताना कोपर खळ्रया मारता मारता गालावरच्याच्या खळीला खुलवणारे, रोजच्या व्यवहारातील गंभीर वाटणाऱ्या गोष्टी गंभीरपणे न घेता तितक्याच मिश्किल पध्दतीने हाताळल्या तर जगणं सोपं होतं.. हे सांगणारे आहे. दादा.. तुमच्या निरीक्षणशक्ती ला आणि लेखणकौशल्याला मनापासून दाद द्यावीशी वाटते. असेच मिश्किल रहा आणि आम्हालाही मिश्किलीत घ्या. आपल्या लेखणीतून असेच मराठी साहित्यातील हा प्रकार नावीन्यपूर्ण रितीने हाताळले जाऊन मिश्किलीला या पुस्तकाच्या माध्यमातून एक वेगळी ओळख मिळो!हीच सदिच्छा.
Datta Chavan
12 Jun 2024 03 14 PM

सामाजिक परिस्तिथीवर हलक्या फुलक्या कोट्या मनाला प्रसन्न करतात. तसेच "पाणीपुरी आणि शेवपुरीची चव पूर्वीसारखी लागत नाही म्हणे. कोरोना नंतर सगळे भाय्ये हाथ धुवायला शिकले, अशी तक्रार आहे." अश्या कोट्ट्यानं मुळे आरोग्य व्यवस्थेवर बोट ठेवण्याचे काम आपल्या हातून झाले आहे. मुश्कि्लीतून मिश्किलीत आणणारे पुस्तक. मिश्किली च्या पुढील आवृत्तीची वाट पहात आहोत.
Uma Joshi
12 Jun 2024 12 56 PM

दैनंदिन जीवनात घडणाऱ्या प्रसंगांमधून उत्पन्न झालेले विनोद हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. अनेक नातेसंबंध अनेक विनोदांना जन्म देतात. ते अचूक टिपून त्यांचा समावेश मिश्किली मध्ये केलेला आहे. खळखळून हसायला लावणारी मिश्किली सर्वांनी जरूर वाचावी.
Tejashri Karnale
12 Jun 2024 12 33 PM

मिश्किली... वाचून झाले आणि खरं सांगू न संपणारी पाने असती तर बरं झालं असतं असं वाटलं. खरं तर बसल्या बैठकीला पुस्तकं वाचायची सवय होती मला. पण मिश्किली मात्र चवीचवीने वाचलं. विनोद म्हणजे हास्याचा धबधबा. पण मिश्किली म्हणजे नाजूक खळखळणारा झरा जो तुमच्या चेहेऱ्यावर मोनालिसा स्मित आणायला भाग पाडतो. या पुस्तकात धर्मपत्नी वर इतक्या निखळपणे मिश्किली लिहिल्या गेल्यात की बायकोला राग येण्या ऐवजी कौतुक वाटून ती नक्कीच याचा आनंद घेईल. रोज समाजामध्ये घडणाऱ्या घटनांचे मिश्किली मध्ये अगदी यथार्थ दर्शन घडवलय. खूप सुंदर पुस्तक आहे... अश्याच मिश्किली लिहीत रहा आणि आम्हाला आनंद देत रहा. तुमच्या पुढील पुस्तक प्रकाशनासाठी आतापासूनच शुभेच्छा 💐💐
शशांक शेवाळे
12 Jun 2024 12 04 PM

मिश्किली हे पुस्तक वाचले आणि हे खूपच सुंदर, अप्रतिम आहे. अतिशय सापेक्ष आणि भावनांना स्पर्शणारे आहे. वापरलेली भाषा आणि शब्द अगदी साधे आणि दैनंदिन जीवनातील आहेत, ज्यामुळे वाचताना खूप आनंद मिळतो. कामाच्या ताणतणावातून विरंगुळा मिळवण्यासाठी हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचू शकतो असे आहे. मला हे खूप आवडले. मी हे सर्व वयोगटांसाठी शिफारस करतो. लेखकाच्या आपल्या जोडीदारावरील प्रेमामुळे त्यांचे लेखन खूप भावनिक आणि आकर्षक झाले आहे. या दोघांचे जीवनातील एकत्र येणे त्यांच्या सर्जनशीलतेतून दिसते. ऑनलाइन उपलब्धता ही एक मोठी सुविधा आहे. हे पुस्तक खरोखरच अद्वितीय आहे. लेखकाकडून आणखी बरेच काही वाचायला मिळावे अशी अपेक्षा आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. या उत्कृष्ट अनुभवाबद्दल अभयजी आणि प्रकाशकांचे खूप खूप आभार. अजून नवीन मिश्किली नवीन आवृत्ती मध्ये वाचण्यास मिळावे ही अपेक्षा.
Leekha Mukund
11 Jun 2024 08 03 PM

I read this book. It's beautiful. So relatable. Language and words used are so easy and used daily in normal homes so it makes it a treat to read. I can read it again and again to ease out the stress of the days work. I loved it. I recommend it for all the age group. The author is so much in love with his partner that it reflects in his work. I wonder how beautiful these two people are blended in life and so is the creation of his work. Availability online makes its cherry on cheese cake. Just wonderful. Looking forward to many more from him. Way to go. Thank you for this treat.
Makarand Ramkrishna Rane
11 Jun 2024 05 28 PM

Beautiful Destressing two Liners .... and apt to one and all. I am sure everyone would enjoy this book. Thanks Abhayji...for the wonderful book. We look forward to more and more writeups and books.... God bless you !
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat