Summary of the Book
श्रीनिवास गडकरी हे रायगड जिल्ह्यातील पेणमधील पत्रकार. पत्रकारिता करताना त्यांनी काही वेगळ्या स्वरूपाच्या बातम्या दिल्या आहेत. नेहमीच्या बातम्यांपेक्षा या बातम्या वेगळ्या असल्याने त्या आजही वाचताना ताज्या व माहिती देणाऱ्या ठरतात. या बातम्यांमध्ये अनेक विषय हाताळले गेले आहेत. या बातम्यांमध्ये लेखकाने राज्यभरचे विषय हाताळले आहे. वेगवेगळ्या संस्था, छंद जोपासणारी मंडळी, एखाद्या विषयाचा ध्यास घेऊन त्याला आधुनिक तंत्राची जोड देणारी मंडळी, अशी विविध स्वरूपाची माहिती यात आहे. या सर्व बातम्यांचे एकत्रित संकलन चांगले झाले आहे.