Summary of the Book
'लेखन व संगीत यात रमणारे, सिनेमाच्या पडद्यावर प्रेम करणारे रत्नाकर पिळणकर हे लेखनात सातत्य राखून पण प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून लिखाण करीत आहेत.
कथा, पटकथा, संवाद, संगीत, नृत्य आणि त्याचबरोबर सिनेमाशी निगडीत तांत्रिक बाजू त्यांच्या सुजाण मिश्रणाने सिनेमा तयार होतो. पिलान्कारांच्या लिखाणात नव्या आणि जुन्या लिखाणाचा संगम प्रवाही भाषेत आढळतो. सिनेमाची नुसती समीक्षा करण्याऐवजी सिनेमाचा रसास्वाद कसा घ्यावा, याचे मार्मिक विवेचन 'शो कॉर्नर' मध्ये आढळते.'
- आमोद प्रकाशन