आयुर्वेदीय गर्भसंस्कार
9789380571089 Arogya Arogyavishayak Ayurvedacharya Dr. Shri Balaji Tambe Ayurvedia Garbh Sanskar Ayurvediy Garbhasanskar (Marathi) Ayurvediya Garbh Sanskar Ayurvediya Garbh Sanskar (Marathi) Ayurvediya Garbhasanskar (Marathi) Ayurvediya Garbhasanskar Marathi Balajee Tambe Balaji Tambe Dr Balaji Tambe Dr. Balaji Tambe Dr. Shri Balaji Tambe Dr. Shri. Balaji Tambe For Ladies Garbh Sanskar Garbhasanskar Garbhsanskar Health Information Sakal Prakashan Sanskarshastra आयुर्वेद आयुर्वेदाचार्य डॉ बालाजी तांबे आयुर्वेदाचार्य डॉ. श्री. बालाजी तांबे आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे आयुर्वेदीय गर्भ संस्कार आयुर्वेदीय गर्भसंस्कार आरोग्य आरोग्यविषयक गर्भ गर्भ संस्कार गर्भसंस्कार डॉ बालाजी तांबे डॉ. श्री. बालाजी तांबे डॉ.बालाजी तांबे बालाजी तांबे सकाळ प्रकाशन स्त्री विषयक. स्त्रीआरोग्य संस्कार संस्कारशास्त्र
Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF
R 990 R 891 / $ 11.42
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
फॅमिली डॉक्टर'मधून "गर्भसंस्कार' ही लेखमालिका सुरू केल्यानंतर अनेक स्त्रियांची पत्रे आली, या विषयाचे गांभीर्य समजावून घेतल्यामुळे त्यांना लाभ झाला तसेच प्रसूती लवकर व नॉर्मल होण्यासाठी असलेला "बाळंत लेप - इझी डिलिव्हरी लेप' वापरल्याने फायदा झाल्याचे अनेकांनी कळवले. ...... ही लेखमाला आमच्या पाहण्यात उशिरा आली, अगदी नववा महिना सुरू असताना आम्हाला ही लेखमाला चालू असल्याची माहिती मिळाली, तेव्हा आम्ही आता काय करावे? अशी विचारणा करणारीही पत्रे आली. या विषयावर चर्चासत्रे वा एक-दोन दिवसांची शिबिरे घेऊन याची अधिक माहिती करून घ्यायची इच्छा दाखविणारी अनेक पत्रे आली. त्यात सुचविलेली योगासने, व्यायाम, मसाज वगैरे शिकण्यासाठी अनेकांनी इच्छा प्रदर्शित केली. अशा तर्‍हेने गर्भसंस्कार विषयाच्या बाबतीत लोक जागरूक झाल्याचे निदर्शनास आले. म्हणून याचे एक पुस्तक तयार केल्यास ते कायम घरात राहू शकेल व पिढ्यांपिढ्या या पुस्तकाचा उपयोग होईल, या दृष्टीने या पुस्तकाचे काम तातडीने करण्याचे नक्की झाले.

आयुर्वेदिक पद्धतीने किंवा भारतीय परंपरेने जे काही सांगितले तशी परिचर्या लोकांपर्यंत पोचवावी व त्याबरोबरीने आधुनिक संशोधनाची मदत घेण्याची वेळ आल्यास किती प्रमाणात व कशी करून घ्यावी यासंबंधीची माहितीही यात असावी असे ठरले. समोर उभ्या टाकलेल्या जीवनाचा विचार महत्त्वाचा ठरतो. म्हणून, जीवन आनंदमय व संतुलित होण्यासाठी कृती म्हणजे "संस्कारां'चे विज्ञान सर्व शास्त्रांनी एकमताने तयार केले.

आयुर्वेद हा जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारा विषय असल्यामुळे त्यात असणार्‍या आठपैकी एका विभागात अपत्यप्राप्ती व स्त्रीआरोग्य यावर लिहिलेले आहे. त्याच्याच जोडीला रसायन व वाजीकरण हे विभागही तयार केले, रसायन व वाजीकरण जर बरोबर नसेल तर स्त्रीआरोग्य, पुरुष आरोग्य व पर्यायाने अपत्य संस्कारित होणार नाही. आयुर्वेदात या अंगाने अनेक गोष्टी सांगितल्या.

मुलांमध्ये काही दोष उत्पन्न झाले, तर आई वडिलांचे आयुष्य व मेहनत अशा मुलाला मोठे करण्यातच खर्ची पडते. त्याउलट जर आरोग्यवान, बुद्धिमान, संस्कारित मुले जन्माला आली तर सर्व काम सोपे होऊन समाजाला उपयोगी घटक तयार होतात. हे संस्कारशास्त्र तयार करताना आयुर्वेदाने जीवनाच्या सर्व अंगाना उपयोगी पडणार्‍या शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक घटकांचा ऊहापोह केला गेला. त्यामुळे गर्भ राहण्यापूर्वीची प्रकृती व तयारीवर विशेष भर दिला. एखादी लहानशी गोष्ट करतानाही काही तयारी करणे आवश्यक असते. लग्न करून स्त्री-पुरुषांनी एकत्र राहू लागणे ही काही गर्भधारणेची तयारी असू शकत नाही. कुठलीही तयारी न करता आलेल्या अनाहूत पाहुण्याला तोंड देताना तारांबळ उडण्याची परिस्थिती न येण्यासाठी "आपल्याला मूल हवे' हे योजनापूर्वक ठरवून नंतरच नवागताला बोलवावे हा साधा व सरळ शिष्टाचार वाटत नाही का? त्यानंतर दिवस राहिल्यावर ज्या ज्या गोष्टींचा प्रभाव गर्भाच्या किंवा मातेच्या आरोग्यावर जन्मभर दिसणार त्या गोष्टींकडे लक्ष देऊन तसे संस्कार करून द्यायला नकोत का?

वास्तविक पाहता, पोटात नऊ महिने गर्भ सांभाळणे हा एक आनंदाचा व उत्सवाचा काळ आहे. गर्भारपणाच्या नऊ महिन्यांच्या काळात काही पथ्ये पाळावी लागतात. काय खावे, काय खाऊ नये, डोहाळे कसे पुरवावे, कुठला योग करावा, कोठली आसने करावीत, स्त्री सतत आनंदात राहण्यासाठी काय करावे, तिने काय पाहावे, आपल्या शयनगृहात तिने कुठली चित्रे लावावीत, रोज कुणाला भेटावे, कुठल्या तरी भलत्याच प्रसंगाला सामोरे जाऊ नये अशी दिनचर्या संस्काराचाच एक भाग असते.

पोटात मूल वाढत असताना कोणती औषधे घ्यावीत, जी उष्णता वाढविणार नाहीत, याची काळजी गर्भारपणात घ्यायला नको का? जन्मजात मुलाच्या अंगावरील त्वचेवर पुरळ (रॅश) असणार नाही, त्याच्या हृदय वगैरे अवयवात काही दोष असणार नाही याची काळजी गर्भारपणातच घेणे आवश्यक असते. गर्भारपणाच्या आधी पंचकर्म करून रसायन वाजीकरण चिकित्सा करून दांपत्याने तयारी केली असल्यासच पुढे चांगले परिणाम दिसतात. "फेमिनाईन बॅलन्स' सारखे संगीत ऐकल्याने सर्व शरीराचे संतुलन होऊन गर्भधारणा होण्यासाठी शारीरिक व मानसिक पातळ्यांवर सुपीक जमीन तयार होऊन गर्भ राहिल्यावर संगीताचा, मंत्रांचा, ओवाळण्याचा वगैरे संस्कार केले तर सुंदर निरोगी व सुदृढ अपत्यप्राप्ती होते असा अनेकांचा अनुभव आहे.

सध्या घरात फारशी कोणी वडीलधारी मंडळी नसतात. गर्भ राहिल्यावर काय करावे, मुलाला कसे वाढवावे, मसाज कसा करावा वगैरे गोष्टी नवदांपत्याला माहीत नसतात. पण याचे शिक्षण घेणे आवश्यक नाही का? नोकरी-धंदा करण्यासाठी व पैसा कमविण्यासाठी आपण सर्व तर्‍हेचे शिक्षण घेतो पण जीवनोपयोगी व कुटुंबास आवश्यक असणारे वंशवृद्धीचे हे शिक्षण घेणेही आवश्यक नाही का? आपल्या घरात वडीलधारी मंडळी वा फॅमिली डॉक्टर असतात तशाच पद्धतीने या सर्व संस्कारांची माहिती आधुनिक पिढीला मिळाली तर खूप उपयोग होऊ शकेल, फॅमिली डॉक्टर हा जसा कुटुंबाचा सल्लागार असतो तसे जीवनाच्या या महत्त्वाच्या अंगांची विस्तृतपणे माहिती व कौटुंबिक मार्गदर्शन देणारे आहे हे "गर्भसंस्कार पुस्तक'.

आयुर्वेदाने सांगितलेल्या गर्भसंस्कारांबरोबरच संगीतशास्त्र, योगशास्त्र, ज्योतिषशास्त्र अशा इतर शास्त्रांनी या विषयात सांगितलेले आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकात विचारात घेतले आहेत. प्रत्येकाने सहकार्य करायचे ठरवून बालक जन्मण्यापूर्वीच जर गर्भसंस्कार करून काळजी घेतली तर जीवनाचे नंदनवन होऊन पुन्हा सर्वांना आनंद, सौंदर्य व शांतीचा लाभ होईल.
Book Review
Write a review

SONAWANE AARTI AMOL
02 Mar 2015 05 30 AM

VERY NICE BOOK & VERY IMPORTANT INFORMATION IN THIS BOOK
NEETA RAHANE
01 Jul 2015 05 30 AM

pregantaci
Dnyanesh Sarode
19/05/2014

Khupach Chhaan Pustak aahe, awarjun ghya aani ekda nakki wacha.
Bharti R Gulhane
09 Feb 2013 05 30 AM

this book is really helpful during my pregnancy . it's help a lot
sonali anilkumar patil
07 Nov 2013 05 30 AM

g.d.pol foundation(y.m.t), Institutions air ea,Sect-4, Kharghar,Navi Mumbai 410210
ashwini
03 Aug 2013 05 30 AM

i want to purchase shkti dhoop,and purifir and other dhoop so is it any shop or branch in nagpur those sale your product,and garbhsanskar book is vvvvvvvvvvv nice
geeta gade
03 Apr 2013 05 30 AM

I so like this book.I am also refer this book first pr agency.
swarangi
22/01/2013

very nice book
DEEPA
19/05/2012

garbhasanskar book is very nice, but very costly, dicier the price .
anagha gawde
20/04/2012

garbhsanskar book is very nice.its not for only pregnent woman this for all of us i m getting very good result in my prgnency and about my baby also so very thanks to dr balaji and my mom bcz she sugess me about grabhsanskar.
Sakhi
13/04/2012

मी हे पुस्तक कालच विकत घेतले .. फकत 670 रु. ला .. किन्मत खूप च जास्त आहे.. अज़ून वाचन चालू आहे.. भरपूर मार्गदर्शन केले आहे , परन्तु सर्व च करण अवघड़ आहे
Prachi K. Naig
12 Dec 2011 05 30 AM

Etaranche review wachun mala pan he pustak wachayachi khup ichha aahe. Kimmat kami keli tar vikat gheta yeil
Ajay mankar
25/11/2011

pustak chan ahe kimmat kami tevali tar sarvana parvadel. Thanks.
gargi kulkarni
26/09/2011

pustak chan ahe pan salgi goshta karna shakya nahi....
Namrata Chaudhari
07 Dec 2011 05 30 AM

Every pregnant woman should read it. very very good book .
रुपाली taware
23/04/2011

बुक खूप छान आहे . गर्भसंस्कार या विषयी चांगली माहिती मिळाली .धन्यवाद.
Sneha
26/03/2011

गर्भसंस्कार पुस्तक थोडे कमी किमतीला ठेवले तर सर्वाना परवडेल. आणि सर्वे जन त्याचा फायदा घेऊ शकतील. SO PLEASE PRICE THODI KAMI KARA. मी थानाला राहते तर मला जवळ कुठे हे पुस्तक मिळेल आणि ते कमी किमतीत मिळेल का?
TRUPTI
26/03/2011

मी नेहमी बालाजी तांबे यांचे फमिली डॉक्टर हे पुस्तक वाचते. आणि त्याचे पालन करते. मला पण वाटते गर्भसंस्कार पुस्तक थोडे कमी किमतीला ठेवले तर सर्वाना परवडेल. आणि सर्वे जन त्याचा फायदा घेऊ शकतील. SO PLEASE PRICE THODI KAMI KARA.
Sarika
19/03/2011

पुस्तक महत्व पूर्ण माहिती पुरवणार आहे. मी अनुभवतेय. फारच छान. अनेक भाषांमध्ये हे याव म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ घेता येईल.
दीपाली भेगडे
17/03/2011

खुच उपयुक्त पुस्तक आहे
anirudha
28/02/2011

मस्त मस्त मस्त !!!
VYAS VARE
18/02/2011

best
raj
02 Nov 2011 05 30 AM

waw
jitu
02 Oct 2011 05 30 AM

garbhasanskar boks is very best to pregnant woman *
Rahul
27/01/2011

nice book...
सचिन kadam
15/01/2011

माझे नाव सचिन आहे. मला हे पुस्तक घेण्याची इच्छा आहे.
राजकुमार शह.
01 Nov 2011 05 30 AM

माझे नाव राज आहे. मला हे पुस्तक घेण्याची इच्छा आहे. पण हे पुस्तक खूप महाग आहे. नियमित तांम्बे गुरीजीना follow करणारा सर्वसाधारण माणूस.
कमलेश
01 Aug 2011 05 30 AM

इतकी किंमत सगळेच वाचक कसे देवू शकतील? पुस्तक तर खूप छान आहे डिसकाउंट थोड वाढवा.... ( पगार कमी असलेला एंक वाचक )
राहुल पाटील
01 Jul 2011 05 30 AM

खूप चांगले .मस्त
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat