Summary of the Book
देशातील ज्येष्ठ गायिका, रचनाकार, चिंतनकार, लेखिका व गुरु म्हणून डॉ. प्रभा अत्रे यांना संगीताच्या जगतात वेगळे स्थान आहे. त्यांनी सुरेशबाबू उर्फ बाबूराव यांच्याकडे संगीताचे धडे गिरवले. सात्विक, शांत, गंभीर, यमन रागाने त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला.
रागविस्तार, एकाच सुराची विविध रूपे बाबुराव यांच्या लहान बहीण हिराबाई बडोदेकर यांनी त्यांना घडविले. या गुरूंच्या आठवणी प्रभा अत्रे यांनी 'स्वरमयी'मधून लिहिल्या आहेत. बडे गुलाम आली खॉं, भीमसेन जोशी या गुरुसमान व्यक्तींबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली आहे.
हिंदुस्तानी संगीतातील अनेक प्रकार त्यांनी मैफलीतून गायले. त्यात स्वतःच्या रचना करून विविध प्रयोग गाताना सादर केले. या संगीत रचनेवर, मैफलींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे.
शास्त्रीय संगीतातील नाती, शिक्षणात संगीताचे महत्व, संगीताचे रसग्रहण, चित्रपट संगीत, कायदा व संगीत याविषयी त्यांनी विचार मांडले आहेत. स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांची ही लेखनमैफल त्यांच्या तरल, मुग्ध आवाजातील गानमैफलप्रमाणे रंगली आहे.