Hard Copy Price:
25% OFF R 160R 120
/ $
1.54
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 160R
120
/ $
1.54
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
आनंदयात्रा हे माझे आत्मचरित्र आहे.आयुष्य हे अनेक सुखदुःखने भरलेले आहे.जीवन जगत असताना सर्वच सुखे असतील किंवा सर्वच दुःखे असतील , तर जगणे नीरस होईल.जगण्याला काही अर्थच राहणार नाही.म्हणून जीवनातील सुखदुःखे सहन करत , प्रत्येक प्रसंगाला सामोरे जावे.तरच जगने ही एक आनंदयात्रा होईल.माझ्या आयुष्यात मी प्रत्येक क्षण आनंदाने जगलो.
लहानपण देगा देवा , मुंगी साखरेचा रवा......
या प्रमाणे मी अगदी स्वच्छंदी जीवन जगलो.निसर्गात मनमुराद भटकलो. जंगलातील रानमेवा खाल्ला.नदी मध्ये अंघोळीचा मनमुराद आनंद लुटला.अनेक सणांचा आनंद लुटला.लहानपणी शाळेकडे मात्र दुर्लक्ष झाले.शाळेपेक्षा निसर्ग मला खूप आवडत असे.निसर्ग आणि समाज यातील अनेक चांगले........वाईट प्रसंग आले.पण ते कधी आले.....गेले , हे कळले देखील नाहीत.पुढे शाळेच्या जगात प्रवेश केला. हा माझ्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट ठरला. शाळेत माझे मन रमले. अभ्यासाची गोडी लागली. प्रगती झाली.पुढे घरातील काही अशुभ घटनांमुळे माझी शाळा सुटली.कसेतरी बी.ए. केले.त्यानंतर माझ्या शिक्षणात जवळपास 10 वर्षांचा गॅप पडला.मात्र अवांतर वाचन चालू होते.म्हणजे मी अप्रत्यक्षपणे शिक्षणाशी जोडला गेलो होतो.नंतर मी डी.एड. केले. CET परीक्षा होऊन शिक्षक झालो.पण वडीलांचे आजारपण हे माझ्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण घटना आहे.तसेच , वडील गेल्यानंतरचा प्रवास अनेक चढउतार यांनी भरलेला आहे.असा हा माझा आनंदी जीवन प्रवास..... आनंदयात्रा.... एक महत्त्वपूर्ण अक्षरशिल्प आहे. तसे पाहिले तर , प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य हे एक वेगळीच साहित्यकृती असते.पण ते लेखनीतून कागदावर उतरले पाहिजे.तरच ती एक साहित्यकृती निर्माण होते. शरदकुमार घोडके