घरातील स्त्रीला कुटुंबासाठी स्वयंपाक करणे चुकत नाही. महिला, मग ती ऑफिसला जाणारी असो वा गृहिणी, तिला कमी वेळेत पण पौष्टिक पदार्थ तयार करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा यांनी ‘टेस्टी हेल्दी रेसिपीज’ या पाककृतींच्या पुस्तकातून केले आहे. पुस्तकाची सुरुवात फळांच्या ज्यूसपासून केली आहे. त्याआधी फळांच्या ज्यूसबद्दलचा गैरसमज दूर करून त्याची उपयुक्तता आणि तो सेवन करण्याची पद्धत सांगितली आहे. चहाची रेसिपीही यात आहे; मात्र तो खास संत्रे, हळदीचा आणि बडिशेपेचा चहा आहे. पुढे सूप्स, सॅलड्स, स्टार्टर्स, मेन कोर्स, डेझर्टस् या विभागांत वेगवेगळे पदार्थ दिले आहेत. त्यात अक्रोड व लसूण डिप, झुकिनीची भाजी आणि चिली जॅम, चिकन बिटकी, कॉलिफ्लॉवरचा कुरकुरीत पिझ्झा, कोरी रोटी, डाळ दिवा, छेना संदेश, फ्रूट अँड नट चिया सीड सॅलड, रवा-खोबऱ्याचे लाडू, हेल्दी व्हेज केक असे नावीन्यपूर्ण, पौष्टिक आणि बनवायला सोपे असे पदार्थ यात दिले आहेत. सोबत अनुभवातून आलेल्या टिप्सही आहेत. या पुस्तकाचा मराठी अनुवाद अक्षय वाटवे यांनी केला आहे.
‘टेस्टी हेल्दी रेसिपीज’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4782594141736874491