Summary of the Book
तो सौंदर्यासक्त आहे. त्याला सुंदर स्त्रियांचा सहवास हवा आहे. पण काळ आणि परिस्थिती त्याच्या विरुद्ध आहे. त्याने दमयंतीला वचन दिले आहे—म्हणून तो ग्लोरियाला नकार देतो. पण मग दमयंतीच त्याला नाकारते—कारण त्याच्या घराण्यावर वेडाचे ढग आहेत...
या बॅरिस्टरला विसरता येणार नाही. कुठेही एकटे बसलात, तर हा बॅरिस्टर तुम्हांला आठवणारच. इतकेच काय, कुठे डुलणारी खुर्ची दिसली, की— बॅरिस्टर आठवणारच !
1977 साली ‘नाट्यदर्पण’ची एकाच वेळी नऊ पारितोषिके पटकावणारे एकमेव नाटक