Summary of the Book
महात्मा गांधी यांना भारताचे राष्ट्रपिता संबोधले जाते, यातच त्यांचे महत्व अधोरेखित होते. इंग्रजांच्या पाशातून देशाला मुक्त करण्यासाठी त्यांनी देशबांधवांना अहिंसेचा मंत्र दिला. त्यांच्या मागे गेले. काय जादू होती महात्माजींकडे, हे समजून घेता येते 'गांधी नावाचा महात्मा'मधून पं.जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी बोस, आचार्य कालेलकर यांच्यापासून रॉय किणीकर, वि. स. खांडेकर, इंदू टिकेकर, शंकरराव खरात आदी विद्वानांनी वेळोवेळी व्यक्त केलेल्या विचारांमधून गांधी उलगडत जातात. गांधीजींची मूल्ये आजच्या वैज्ञानिक, यांत्रिक, आर्थिक युगातही कशी लागू पडतात, याचे मार्गदर्शन होते. यांचे संपादक रॉय किणीकर आहेत.