Summary of the Book
आर्ट ऑफ ग्रॅफिक सटायर - व्यंगचित्रकला!
चटकन लक्ष वेधून घेणारा एक लोकप्रिय साहित्यप्रकार - अशा या साहित्यप्रकारातून - म्हणजेच व्यंगचित्रातून - एक निश्चत स्टेटमेंट करणार्या वसंत सरवटे यांच्या ’माणूस’ या साप्ताहिकाच्या काळातला (१९६९ ते १९७२) चित्रांचा खजिना म्हणजे हे पुस्तक. त्या त्या वेळच्या घटनांना खुसखुशीत टोले मारणारी ही व्यंगचित्रं आज जवळपास ४० वर्षांनंतर पाहाताना त्या कालावधीचे एक मजेदार भान देऊन जातात.
या पुस्तकातून, नव्हे संग्रहातून दोन गोष्टी जाणवतात. एक म्हणजे, व्यंगचित्र हा तत्कालीन राजकीय/सामाजिक घटनांचा त्यावरील भाष्यासह इतिहास असतो. आणि दुसरे म्हणजे, निर्विष, कुठलाही ’इझम’ न बाळगता केलेली थट्टा, समाजातल्या विविध स्तरांवरच्या विसंगतीची तीप जाणीव, मानवी जीवनाबद्दची आस्था आणि हाती असलेल्या माध्यमाचं गांभीर्य जाणणारा कलावंत!