फोजमल पाखरे सर
30/07/2023
होरपळ शेतकर्यांच्या जीवनाचा जीवनपट उलगडून सांगणारा काव्यसंग्रह
— फोजमल पाखरे
( सहशिक्षक) जि. प . शाळा
करमळा, सोलापुर
तानाजी धरणे हा माझा विद्यार्थी असुन सन १९९० पासुन कविता करत आहे .नुकतिच त्याची " हेलपाटा " कादंबरी प्रकाशित झाली असुन जीवनातील सर्व भौतिक सुख आज त्याच्या अवती भवती उभी आहेत . शासकीय सेवेत असल्याने जगण्याची भ्रात आता त्याला नाही . 33/34 वर्षापुर्वी त्याचा संघर्ष टोकाचा होता .आयुष्य घडवताना " हेलपाट्यांनी पदोपदी त्याची जीद्द , उमेद ,अभेद्य राहीली .
माणसाच्या मनात भावभावनांची अनेक तळघरं असतात . कविता म्हणजे कविच्या अनुभवांचा एक हुंकार असतो . सुखद आणि दु:खद आठवणींना अनेक भावना, आशा , वेदना- संवेदना अशा अनेक धाग्यात गुंफलेलं मन काव्याच्या रुपानं बाहेर पडत असतं .
ह्या त्याच्या भावना व्यक्तीगत असल्यातरी त्या कागदावर आल्या म्हणजे त्याला वैश्विक रुप आपोआपच प्राप्त होते . आणि हा कवितेचा धर्मच असतो .समाजस्पदनेचा वेध घेऊन सत्याचा शोध घेण्याचा कविमन नेहमिच प्रयत्न करत असतं .
जीवन संघर्षाच्या याञेमध्ये सगळ्यानांच फुलांची सेज मिळत नाही . अनेकांच्या जीवनामध्ये " होरपळ " वाट्याला येते . जगाचा पोशिंदा शेतकरी राजा. पण त्याच्याच आयुष्यात अठराविश्व दारिद्र्य , दु:ख, यातना ठासुन भरलेल्या असतात .तरीही तो नव्या उमेदीने जगाचा पोशिंदा उभा राहतो .
कवी तानाजी धरणे यांनी अचुकपणे आपल्या कवितेत त्याची ' होरपळ ' व्यक्त केली आहे .
मोजले तारे , मोजले वारे
भूक नाही मोजली
बांधावरचे पोट भूकेले
खुजी यंञणा माजली ..!
शेतात राबताना शेतकरी उपाशीपोटी राबुन जगाची काळजी घेतो पण इथली सडलेली व्यवस्था माञ त्याची कदर करत नाही . हे पोटतिडकिने मांडतो .
रोज मरतानाही माझा शेतकरी उद्याची गोड स्वप्न पाहत असतो . तो त्याचा धीर सोडत नाही .भविष्याच्या गर्भात त्याला उज्ज्वल ,आशादायी असं काहीतरी दडलयं हे त्याला माहीत असतं म्हणुन कवी म्हणतो ......
तप्त वैशाख पेटला
तापली ढेकळांची काळी माती
'बाप' हाकतो नांगर
' आई ' काशा वेचत होती ...
कुणीतरी मातीत गाडुन घेतलं तर सुंदर फळं पुढच्या पिढीला चाखता येतात. तेंव्हा कवी म्हणतो ....
बीज चिमुट भरुन
लावलं सरीला धरुन
आसं उद्याचं सपानं
ठेवलं मातीत पुरुनं .......
एवढा आशावादी असुनही बळीराजाच्या कष्टाची, स्वप्नांची कशी होरपळ होते याची दाहता कवीने प्रकर्षाने शब्दबद्ध केली आहे .
आंबा गेला गेली केळी
आवकाळीची वेदना भाळी
कालपर्यन्त सर्व निट
क्षणाचा पाऊस स्वप्न जाळी ...
कितीदा पडावं ,कितीदा रडावं,कितीदा गाडावं जीवनाची " होरपळ " काही केल्या कष्टाच्या आसवांनी विझत नाही . हे दाहक सत्य कवीच्या अंतर्मनातुन कागदावर वरील ओळीतुन तो व्यक्त होतो .
शहरी जीवनामुळे माणसाचा आणि माणुसकीचा चेहरा पार फाटुन गेलाय कधीतरी वाटतं त्या बालपणीच्या रम्य आठवणीत पुन्हा एकदा जन्म घेवा ,खेड्याशी असलेली त्याची नाती अन तिथली माती पुन्हा त्याला खुनावते आहे .
'आधुनिकतेच्या नावाखाली ', ' गंध मातीचा ' , ' रानवारा ' , ' गावखात्यात, ' सुगी ' या कवितामधुन त्याच्या मनाची काहीली व्यक्त होते .
त्याचबरोबर ' मुळशी पॅटर्न ' कवितेतुन उद्धवस्त झालेली नवी पिढी व्यासनाधिनता , कंगाल आणि गुन्हेगार कशी झाली हे दारुण सत्य सांगताना भेदक शब्दात तो व्यक्त होतो .
कवडीमोल जमिन गेली
गेला पाटलाचा सुभा
कंपणीच्या गेटवर सुद्धा
वाॅचमेन म्हणुन नाही मुभा ....
सुखाच्या गालीच्यावर लोळणार्या नव्या पिढीला भूतकाळात वाडवडीलांनी सोसलेल्या कष्टाची व्यथा सांगताना कवी म्हणतो ...
भळभळणार्या जखमावर
जरी घातली फुंकर कोणी
यातना या जाळत जातात
खपल्या दुखतात मनोमनी ....
जीवनात प्रत्येक क्षेञात प्रत्येक घटकाची ' होरपळ ' चालुच आहे .स्ञीच्या जीवनाची कथा सांगताना खोट्या रुढी,परंपरा वंशाचा दिवा या भ्रामक कल्पनेपायी गर्भातच तीला कसं संपवलं जातं जिजाऊ, साविञी , आहिल्याबाईचा वारसा सांगणार्या समाजाकडून हे होतय हे पाहुन संवेदनशिल मनाची ' होरपळ ' झाल्याशिवाय राहत नाही .
उमलु द्या कळ्यांना
नका तोडु देठापासुन
ज्योतीपासुन ज्योत घेवु
भ्रूण हत्तेला रोखून ...
समाज्यातील दारिद्र्य ,दु:ख , अवेलना , विश्वासघात , छळ , कपट , द्वेश ,मत्सर ,लोभ , माया या अवगुणांनी अनेकांच्या जीवनात ' होरपळ ' निर्माण होते . या होरपाळणार्या प्रतिमांचे यथार्थ भावूक वर्णन कवी तानाजी धरणे यांच्या प्रत्येक कवितेतुन वाचावयास मिळत आहे .
तसेच ' प्रतिबिंब ' वाट , ' गावशिवार ', ' जोखड ', 'गरुडझेप' , 'वसंतपंचमी', ' विळखा ', 'प्रतिक्षा ', या सुंदर कवितामधुन निसर्गाविषयी असनारे प्रेम , सौदर्यदृष्टी यांचे यथार्थ दर्शन आपणास वाचावयास मिळते .
एकंदरीत यापुर्वी ' शेताच्या बांधावर ', ' सांजवेळ', 'स्वप्नचिञ ', ' चांदणं पेरीत जाऊ ' हे चार कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत . " होरपळ " हा त्यांचा पाचवा कविता संग्रह खुपच सुंदर व वाचणीय आहे . यातील सर्वच कविता हृदयस्पर्शी आहेत . वाचकांना या सर्व कविता नक्कीच आवडतील मनाला भावतील यात शंकाच नाही . हा काव्यसंग्रह सर्वगुणसंपन्न झाला आहे .
कवी तानाजी धरणे यांचा हा कविता संग्रह म्हणजे विझणार्या ज्योतीला ओंझळीची गरज असते .अंधारात चमकणार्या काजव्यांना जपलं पाहीजे. पारध होनार्या हरणांना अभय दिलं पाहीजे . आंधारलेल्या वाटा शोधताना हातात हात ठेवला पाहीजे . हृदयात होनार्या जखमांची शुश्रुषा करणं गरजेचं आहे .हे सर्व आपल्या कवितेतुन करण्याचा छोटासा प्रयत्न कवी म्हणुन तानाजी धरणे यांनी